जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज ठाकरेंचं आणखी एक पत्र; आताच्याही मागणीला हिरवा कंदील?

अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज ठाकरेंचं आणखी एक पत्र; आताच्याही मागणीला हिरवा कंदील?

अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज ठाकरेंचं आणखी एक पत्र; आताच्याही मागणीला हिरवा कंदील?

आता राज ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात एक पत्र लिहिले होते. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर राज ठाकरे यांच्या विनंतीला मान देत भाजपने आपला उमेदवार मागे घेत माघार घेतली. दरम्यान, आता राज ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र - प्रति, सन्मा. श्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. सस्नेह जय महाराष्ट्र ! महोदय, ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि सध्या कोरडवाहू तसंच बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.

जाहिरात

दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती..

News18लोकमत
News18लोकमत

आपला नम्र राज ठाकरे हेही वाचा -  Ashish Shelar BJP : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी म्हणजे हा एक उठाव, आशिष शेलारांच्या वक्तव्याने खळबळ दरम्यान, आता राज ठाकरेंच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील परिस्थिती संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करतात का, राज ठाकरेंच्या या पत्राला कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात