मुंबई, 17 एप्रिल: लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाडे तत्वावर राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. घर मालकांनी तीन महिने भाडेकरुंकडे घरभाड्यासाठी तगादा लावू नये, असे आदेश गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव कुमार यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आहे. परिणामी उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. अनेकांनी बिनपगारी सुट्टीवर जावे लागले आहे. अशा परिस्थितीत अनेक भाडेकरूंना घरभाडे भरणे शक्य नाही. त्यामुळे घरमालकांनी तीन महिने भाडेकरुंकडे घरभाडे भरण्याचा तगादा लावू नये. वेळेवर भाडे भरले नाही म्हणून त्यांना निष्कासित करू नये, असे राज्य सरकारने सर्व घरमालकांना दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. हेही वाचा.. Good News:सप्टेबरपर्यंत येणार कोरोना लस, 100 देशाचे वैज्ञानिक गुंतले संशोधनात बँक आणि सामान्य नागरिकांसाठी RBIची मोठी घोषणा दुसरीकडे, कोरोना व्हायरसमुळे देशभरात सुरू असलेल्या भयंकर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) काही ठोस पावलं उचलण्यात आली आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील बँका आणि सामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. RBI ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करून 3.75 टक्के करण्यात आला आहे. नाबार्ड NHB आणि SIDBI मध्ये आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एजन्सींना रेपो रेटवर कर्ज मिळेल. NHBला 10 हजार कोटी, सीआयडीबीआयला 15 हजार कोटी तर नाबार्डला 25 हजार कोटी रुपये मिळतील. याकरता एकूण 50 हजारांचे पॅकेज आरबीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज देण्याचे काम नाबार्डकडून करण्यात येते तर SIDBI छोट्या उद्योगांसंबधीत तर NHB गृहनिर्माण क्षेत्राशी संबधित अशा या बँका आहे. परिणामी या शेती, छोटे उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राचे नुकसान होऊ नये याकरता ही घोषणा करण्यात आली आहे. हेही वाचा.. लॉकडाऊनमध्ये तुमची नोकरी गेली किंवा पगार कापला तर थेट पंतप्रधान घेणार आढावा दरम्यान, कोरोनाच्या प्रत्येक घडामोडींबाबत आरबीआय सतर्क आहे. ते पुढे म्हणाले की, ‘या प्रसंगाशी सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करण्याचे आमचे मिशन आहे. आरबीआय या काळात खूप सतर्क आहे. प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही नवनवीन घोषणा करतो आहोत.’ गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी घोषणा केली की, 30 जूनपर्यंत बँकांना एनपीए घोषित करावा लागणार नाही. त्याचप्रमाणे बँकांना त्यांनी आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त ग्राहकांना ईएमआयमध्ये सूट देण्यात यावी. संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.