‘सत्ता येते-जाते पण...’, कुटुंबातील वादावर पुन्हा भावुक झाल्या सुप्रिया सुळे

‘सत्ता येते-जाते पण...’, कुटुंबातील वादावर पुन्हा भावुक झाल्या सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांना भावनिक आवाहन.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी (23 नोव्हेंबर) रोजी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अजित पवार गटानं शरद पवारांना दगा देत भाजपला समर्थन दिले आणि सरकार स्थापन करण्याची तयारी दर्शवली. अजित पवारांच्या समर्थनामुळे देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबरला पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, या सगळ्यात पवार कुटुंबातील गृह कलह प्रकर्षाने सर्वांसमोर आला. मात्र अजूनही राष्ट्रवादीकडून आणि पवार कुटुंबाकडून अजित पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या whatsapp स्टेटसवर टाकलेला मेसेजची चर्चा होती Party and family split असं त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. दरम्यान आजही सुप्रिया यांनी, “I believe…power comes and goes…only relationship matter…”, असे स्टेट्स ठेवले आहे. सुळे यांनी या मजकुरातून, ‘मला वाटतं सत्ता येते जाते, मात्र नाती कायम राहतात’, असे म्हणत आपले दु:ख व्यक्त केले. यावरून पवार कुटुंबात फूट पडल्याचं त्यांनी मान्य केल्याचं यावरून दिसतं.

वाचा-13 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी दिले होते बंडखोरीचे संकेत, काकांना समजलेच नाही?

वाचा-माझ्या कुटुंबाने गैरसमज करून घेऊ नये...' राष्ट्रवादीच्या गायब आमदाराची भूमिका

रोहित पवारांनी केले अजित पवारांना भावनिक आवाहन

राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी त्यांना एक भावनिक आवाहन केलं आहे. 'आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,' असं म्हणत रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना परतण्याचं आवाहन केलं आहे.

वाचा-काँग्रेस नेते म्हणाले, हे 'सरकार' म्हणजे अल्पवयीन मुलीशी झालेलं 'लग्न'!

शरद पवार वळणार अजित पवारांचे मन

अजित पवारांचं मन वळवून भाजपचं सरकार उलथून टाकण्यासाठी शरद पवार यांनी आपलं विश्वासू अस्त्र बाहेर काढलं. अजित पवारांची पुन्हा घरवापसी करण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत बैठकीसाठी गेले होते. अजित पवार यांचं मन वळवून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीसोबत आणण्यात दिलीप वळसे पाटील यांना यश आल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या