13 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी दिले होते बंडखोरीचे संकेत, पण काकांना समजलेच नाही?

13 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी दिले होते बंडखोरीचे संकेत, पण काकांना समजलेच नाही?

एका रात्रीत अजित पवार गटानं शरद पवारांना दगा देत भाजपला समर्थन दिले आणि सरकार स्थापन करण्याची तयारी दर्शवली.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एखाद्या सिनेमापेक्षा जास्त नाट्यमय घटना घडत आहेत. एका रात्रीत अजित पवार गटानं शरद पवारांना दगा देत भाजपला समर्थन दिले आणि सरकार स्थापन करण्याची तयारी दर्शवली. अजित पवारांच्या समर्थनामुळे देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबरला पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्या सरकाराविरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज युक्तिवाद झाल्यानंतर सोमवारी (25 नोव्हेंबरला) सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या सगळ्यात पवार कुटुंबातील गृह कलह प्रकर्षाने सर्वांसमोर आला. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर पवारांनी त्याची पक्षातून हकालपट्टीही केली. मात्र मुंबई मिररनं दिलेल्या बातमीनुसार अजित पवार यांनी 13 दिवस आधीच म्हणजेच 10 नोव्हेंबरला शरद पवार यांच्यासमोर भाजपसोबत जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र पवारांनी ही बाब मनावर घेतली नाही. त्यांनी अजित पवार यांनी परस्पर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात सुरुवात केली.

वाचा-शरद पवारांनी अजित पवारांकडे पाठवलेल्या दूतांच्या हाती अपयश?

शरद पवारांना पहिला संकेत

मिररनं दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी 17 नोव्हेंबरला शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचे संकेत दिले होते. ही बैठक पुण्यात झाली होती. या बैठकीत अजित पवार शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले. याकडे शरद पवारांनी कानाडोळा केला, आणि तोच त्यांना महागात पडला. 17 नोव्हेंबरनंतर अजित पवारांच्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चांना वेग आला.

वाचा-'...तर देशात हुकूमशाही लागू करा', महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पोंक्षे संतापले

शरद पवारांसाठी दुसरा संकेत

शरद पवारांनी त्यावेळी अजित पवारांच्या संकेतांकडे दुर्लक्ष केले असले तरी, त्याना अजित पवार यांचे मन कळले होते. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. ऐवढेच नाही तर एका बैठकीत धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनीही अजित पवारांप्रमाणे भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते.

वाचा-अजित पवारांच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवडमध्ये झळकली अशी पोस्टर्स

13 दिवस अजित पवारांनी केली फडणवीसांची चर्चा

मुंबई मिररनं केलेल्या दाव्यानुसार सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात 10 नोव्हेंबरपासून चर्चा सुरू होती. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेची बातमी ही फक्त धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांना होती.

Published by: Priyanka Gawde
First published: November 24, 2019, 3:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading