मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /काँग्रेस नेते म्हणाले, हे 'सरकार' म्हणजे अल्पवयीन मुलीशी झालेलं 'लग्न'!

काँग्रेस नेते म्हणाले, हे 'सरकार' म्हणजे अल्पवयीन मुलीशी झालेलं 'लग्न'!

अजित पवारांकडून चूक झाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वगृही परत यावे

अजित पवारांकडून चूक झाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वगृही परत यावे

अजित पवारांकडून चूक झाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वगृही परत यावे

स्वाती लोखंडे,(प्रतिनिधी)

मुंबई,24 नोव्हेंबर: राज्यात स्थापन झालेले भाजपचे सरकार म्हणजे अल्पवयीन मुलीशी झालेलं लग्न असून ते अवैध आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. एका रात्रीत स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य, अनैतिक असून लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. या सरकारचे लवकरच अधिपतन होणार आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचेच सरकार येणार आहे, असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

" isDesktop="true" id="421083" >

विजय वडेट्टीवार सध्या मुंबईत आहेत. त्यांनी 'News 18 लोकमत'शी संवाद साधला. काँग्रेसचे सर्व 44 आमदार जे डब्ल्यु मॅरिओट हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. सगळे पक्षाशी प्रामाणिक आहेत. एकही आमदार पक्षाच्या विरोधात नाही त्यामुळे आमदार फुटण्याची भीती नाही. सगळ्यांनी एकत्र राहवे, एकत्र चर्चा करावी, या दृष्टीकोणातून सगळे येथे आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

सच्चे का बोल बाला...

भाजप फोडाफोडीचा प्रयत्न करून फसली आहे. त्याचं प्रायचित्य भाजपला करावे लागेल. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजुने येईल, यावर 100 टक्के विश्वास आहे, असा दावा करत 'सच्चे का बोल बाला. छुटे का मुहं काला, असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

'सरकार' म्हणजे अल्पवयीन मुलीशी झालेलं 'लग्न'!

राज्यात स्थापन झालेले सरकार हे घटनाबाह्य आहे. अनैतिक आहे. लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. 'सरकार' म्हणजे अल्पवयीन मुलीशी झालेलं 'लग्न'! असून अशा सरकारचे लवकरच अधीपतन होणार आहे. सरकारमध्ये थोडा शहाणपणा असेल तर राजीनामा देऊन चूक सुधारावी, अन्यथा महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही.

अजित पवारांना दिला हा सल्ला..

अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपला साथ दिली आहे. अजित पवारांकडून चूक झाली आहे. त्यांनी ती मान्य करून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वगृही परत यावे, अशी आमची अपेक्षा आहे. अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षांचे नेते आणि पवार कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईतील जे डब्ल्यु मॅरिओट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. काँग्रेसच्या आमदारांची सर्व व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही नसीम खान यांच्याकडे देण्यात आली आहे.

First published:

Tags: BKC mumbai, Congrss, Maharashtra government महाराष्ट्र, Shiv sena, Vijay wadettiwar