जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', कंगनाच्या वक्तव्यावर करण जोहरचं नाव घेत बबिताचाही आरोप

'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', कंगनाच्या वक्तव्यावर करण जोहरचं नाव घेत बबिताचाही आरोप

बबिताने अत्यंत तीव्र शब्दात शिवसेनेवर टीका केली आहे, आपल्या वक्तव्यात तिने शिवसेनेची औकात काढली आहे.

बबिताने अत्यंत तीव्र शब्दात शिवसेनेवर टीका केली आहे, आपल्या वक्तव्यात तिने शिवसेनेची औकात काढली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येसाठी नोपेटिझम आणि बॉलीवडूकरांना जबाबदार धरलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. नैराश्यात सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्या बोललं जात आहे. मात्र त्याच्या आत्महत्येनंतर अशा अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात ज्यामध्ये नोपेटिझम आणि बॉलीवडूकरांना जबाबदार धरलं जात आहे. सुशांतची आत्महत्या नव्हे तर मर्डर असल्याचं अभिनेत्री कंगणा रणौत (kangana ranaut) म्हणाली आणि तिच्या या प्रतिक्रियेनंतर कुस्तीपटू बबिता फोगटही (babita phogat) व्यक्त झाली आहे. बबिताने करण जोहरचं नाव घेत त्याच्यावर आरोप केलेत.

जाहिरात

बबिता म्हणाली, “करण जोहर कोण आहे? फिल्म इंडस्ट्री त्याने किती गलिच्छ करून ठेवली आहे. त्याची मक्तेदारी आहे का? फिल्म इंडस्ट्री याला सडेतोड उत्तर का देत नाही? एक आमची वाघीण कंगना रणौतच आहे, जी त्याला उत्तर देते. या गँगच्या सर्व फिल्मवर बहिष्कार टाका” हे वाचा -  मित्राला, सहकलाकाराला निरोप देण्यासाठी अखेर जमले बॉलिवूडचे कलाकार कंगनानाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सांगते, सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं सांगत आहेत की, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की, माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल.

कंगणा पुढे सांगते, छिछोरे सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला एकही अवार्ड मिळत नाही आणि गली बॉय सारख्या सिनेमाला अनेक अवॉर्ड मिळतात. अनेकांनी त्याच्यावर चुकीचे आर्टिकल लिहिले होते. यांना संजय दत्तची व्यसनं दिसत नाहीत पण त्यांनी सुशांतला व्यसनी म्हटलं होतं. अनेक लोक मला मेसेज करतात की, तुझा कठीण काळ आहे तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. याचा अर्थ असा की, या इंडस्ट्रीतले लोक अशाप्रकारे फिल्मी बॅकग्राउंड नसलेल्या कलाकारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. सुशांतनं असं खचून जाऊन त्यांना बरोबर आणि स्वतःला चुकीचं सिद्ध करायला नको होतं. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात