Live Updates: आतापर्यंत 3215 एसटी कर्मचारी निलंबित तर 1226 जणांची सेवासमाप्त

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | November 26, 2021, 21:16 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    22:7 (IST)

    पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनानं 5 जणांना चिरडलं
    अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

    20:11 (IST)
    एमपीएससीच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती, मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी काढली याबाबतची शासन अधिसूचना
    19:32 (IST)

    नाशिक - सातपूर हत्येप्रकरणी आरोपीला अटक
    आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी
    भाजप पदाधिकाऱ्याची केली होती हत्या
    कामगार युनियन लावण्याच्या वादावरून हत्या
    यापूर्वी दोघेही एकाच युनियनमध्ये करत होते काम
    हत्येच्या घटनेवरून भाजप झाली होती आक्रमक
    सातपूर पोलीस ठाण्यासमोर केलेलं ठिय्या आंदोलन

    19:18 (IST)

    कर्मचारी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा - अनिल परब
    अधिक सुधारित वेतनश्रेणीची मागणी केली - परब
    'संप मिटल्यावर यावर चर्चा करून निर्णय घेणार'
    एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार नाही - अनिल परब
    जाचक अटी रद्द करता येईल का? निर्णय घेणार - परब
    सरकारनं नियमित पगार देण्याची हमी घेतलीय - परब
    7व्या वेतन आयोगाच्या मागणीवर विचार करू - परब
    विलीनीकरण मुद्दा सरकारच्या हातात नाही - अनिल परब
    'तो' निर्णय आल्यावर विचार करता येईल - अनिल परब
    'एसटी बंद राहणं हे सहन न करता येणारं आर्थिक नुकसान'
    सतत आर्थिक भार स्वीकारणं शक्य नाही - अनिल परब
    एसटी कामगारांनी त्वरित संप मागे घ्यावा - अनिल परब
    एसटी कामगारांचे हक्क अबाधित ठेवणार - अनिल परब
    कर्मचारी संघटना चर्चेत सकारात्मक - अनिल परब
    अजून एक दिवस निलंबन न करण्याचा निर्णय - परब
    'उद्या कामावर येणाऱ्या कामगारांवर कारवाई नाही'
    'आम्ही कोणत्याही मागणीला नाही असं म्हटलं नाही'
    'संप मिटल्यावर आर्थिक अभ्यास करून निर्णय घेणार'
    संप सुरू असताना वाटाघाटी नाहीत - अनिल परब
    केवळ एका मुद्यासाठी संप ताणू नका - परिवहन मंत्री
    'मला आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांशी घेणंदेणं नाही'
    एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटू नये - अनिल परब
    500 रोजंदारी कामगारांची सेवासमाप्ती - अनिल परब

    18:53 (IST)

    अनिल परब आणि कृती समितीची बैठक संपन्न
    मुंबई सेंट्रल मुख्यालयात सुरू होती महत्वाची बैठक
    विलीनीकरणाची मागणी कायम - संदीप शिंदे
    मात्र दिलेली वेतनश्रेणी अमान्य - संदीप शिंदे
    'सुधारणा करावी ही आमची मंत्र्यांकडे मागणी'
    'सेवा सुरळीत झाल्यावर विचार करण्याचं आश्वासन'
    'अवाजवी दंड आकारणी रद्द करण्याचं आश्वासन'
    'सरकारनं वाहतूक सुरू करावी ही मागणी मान्य'
    'कामावर रुजू व्हा, आमची कर्मचाऱ्यांना विनंती'
    कर्मचाऱ्यांनी कामावर जावं, कृती समितीचं आवाहन
    'काही राजकीय लोकांमुळे आंदोलन भरकटत गेलं'
    'मैदान सोडणाऱ्यांना कर्मचाऱ्यांची दया आली नाही'
    खोत आणि पडळकरांवर नाव न घेता केली टीका
    'सातवा वेतन आयोग लागू करा ही आमची मागणी'
    चर्चा करण्याचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन - संदीप शिंदे

    18:26 (IST)

    शिर्डीतील प्रसादालय अनेक महिन्यांनंतर सुरू, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर प्रसादालय सुरू, पहिल्या दिवशीच साईभक्तांचा उत्तम प्रतिसाद, दिवसाला 25 हजार भाविकांना भोजन देण्याचं साई मंदिर प्रशासनाचं नियोजन

    18:19 (IST)

    मुंबई - वडाळ्यात रेशनिंग कंट्रोलरची धडक कारवाई
    बोगस बायोडिझेलच्या अड्ड्यावर पथकाचा छापा
    रेशनिंग कंट्रोलर कान्हुराज बगाटेंच्या नेतृत्वात कारवाई
    बोगस बायोडिझेलच्या नावाखाली विकत होते केमिकल
    कारवाईत 93 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

    18:15 (IST)

    नाशिक - शनिवारी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
    गंगापूर, मुकणे धरणाच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम
    रविवारी सकाळीही होणार कमी दाबानं पाणीपुरवठा
    पाणी जपून वापरा, नाशिक मनपा प्रशासनाचं आवाहन

    18:6 (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीत वक्तव्य
    'महाराष्ट्रात कुठल्या राजकीय चर्चांना उधाण, कल्पना नाही'
    संघटनात्मक बांधणी, संघटनेच्या पुढील वाटचालीवर चर्चा
    'दिल्लीत याच विषयावर चर्चेसाठी आलो, इतर अजेंडा नाही'
    कुठलाही संघटनात्मक बदल होणार नाही - फडणवीस
    'अमित शाह आमचे नेते, दिल्लीत आल्यावर भेट होते'
    राणे काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही - फडणवीस
    'नागपुरात कितीही जोर लावला तरी बावनकुळे जिंकणार'

    17:4 (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब एक्सक्लुझिव्ह
    36 डेपोंमध्ये काम सुरू झालंय - अनिल परब
    कर्मचाऱ्यांनी संपावर अडून बसू नये - अनिल परब
    सरकार अनेक पावलं पुढे आलंय - परिवहन मंत्री
    एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ - अनिल परब
    विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट - अनिल परब
    'विलीनीकरण निर्णय समितीच्या अहवालानंतर'
    'विलीनीकरण म्हणजे काय, अनेकांना माहीत नाही'
    एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - अनिल परब
    'संप सुरू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार'
    राज्य सरकारच्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस
    कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण - परब
    'संप मिटवा, चर्चेला या, आम्ही भूमिका घेऊ'
    संपामुळे एसटी, कर्मचाऱ्यांचं नुकसान - परब
    संपासंदर्भात कुणाशी बोलावं हा प्रश्न - परब
    'प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी आम्ही चर्चा केली'
    'एसटीची वाईट अवस्था यापूर्वी कधी नव्हती'
    कोरोना काळात एसटीचं उत्पन्न घटलं - परब
    2 वर्षं एसटी आर्थिक गर्तेत सापडली होती - परब
    एसटीचं उत्पन्न बुडाल्यानं ही परिस्थिती - परब
    राज्याच्या जनतेबाबत दायित्व - परिवहन मंत्री
    'एसटीचं उत्पन्न वाढेल याबाबत विचारविनिमय'
    'पूर्ववत होण्यासाठी कर्मचाऱ्यांचीही मदत हवी'
    'पडळकर-खोतांनी कामगारांचं नेतृत्व केलं'
    गुणरत्न सदावर्तेंसोबतही चर्चा केली - अनिल परब
    'कामगारांना समजवणारा नेता सापडला नाही'
    माझी चूक असल्यास नक्की मान्य करेन - परब
    'एसटी कामगारांना भडकावण्याचे प्रयत्न सुरू'
    माझ्याकडून मी वेळेवर प्रश्न धसास लावला - परब
    कामगारांनी सगळ्या गोष्टींचा विचार करावा - परब
    कामगारांनी अफवांना बळी पडू नये - अनिल परब
    एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - अनिल परब

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स