liveLIVE NOW

LIVE: महाराष्ट्रात लशींचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या एक कोटींवर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 26, 2021, 17:14 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:49 (IST)

  रत्नागिरी - तिवरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा
  6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले
  डोंगरावरील भागाला भेगा गेल्यानं 100 घरांना धोका
  पुराच्या पाण्यात भेंदवाडीतील पूलही गेला वाहून
  गावकऱ्यांचं तात्पुरतं समाज मंदिरात स्थलांतर
  व्यवस्था नसल्यानं अंदाज घेऊन ग्रामस्थ पुन्हा घरात
  तिवरे गावात जाणारे अनेक पूल वाहून गेल्यानं अडचण
  तिवरे गावात जाण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान

  20:23 (IST)

  अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून गणेशभक्तांना 24 तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था, कोरोना नियमावलीनुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकरांची विनंती

  20:18 (IST)

  ऊर्जामंत्री नितीन राऊत आज महाड, पेण, नागोठणेच्या दौऱ्यावर, वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार

  19:54 (IST)

  सीएसआर निधी तसेच बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयानं लसीकरण अधिक गतिमान करावं - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

  19:51 (IST)

  'कोकणात पुराचा इशारा देणारी यंत्रणा 3 महिन्यांत, एसडीआरएफचं बळकटीकरण करणार - मुख्यमंत्री

  19:33 (IST)

  मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा, आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा; कोकण व पश्चिम महाराष्ट्राला आर्थिक मदत करण्यासाठी तयारी सुरू, पूरस्थितीत किती आर्थिक नुकसान झालंय याचा आढावा घ्या, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
  येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक अहवाल समोर ठेवला जाईल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थखात्याचे सचिव आणि अधिकाऱ्यांमध्ये उद्या होणार बैठक
  अनेक घरांसह व्यापाऱ्यांनाही मदत करणार असल्याची माहिती, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत करण्यासाठी राज्य सरकार सज्ज
  रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा तातडीनं सुरू करा, आरोग्य विभागानं जंतुनाशक फवारणी, लोकांना लसीकरण, गोळ्या-औषधं पुरवावीत, पिण्याच्या पाण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी टॅंकर्सनं पाणी पुरवावं - उद्धव ठाकरे

  19:15 (IST)

  सांगली - प्राथमिक स्तरावर पूरग्रस्तांना तातडीची मदत 10 हजार रुपये आणि 5 हजारांचं धान्य देणार, मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती

  19:4 (IST)

  राज्यपाल रायगड आणि रत्नागिरीचा दौरा करणार
  पूरग्रस्त भागात स्वत: राज्यपाल पाहणी करणार

  19:1 (IST)

  गडचिरोलीच्या लवारी जंगल परिसरातील घटना
  माओवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळला
  पेरून ठेवलेली जिवंत स्फोटकं, शस्त्रसाठा जप्त

  18:42 (IST)

  खासगी शाळांच्या 15 टक्के फी कपातीचा मुद्दा
  अध्यादेश काढण्याची शिक्षण विभागाची तयारी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स