• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरू होणार

LIVE Updates: जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरू होणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 24, 2021, 23:37 IST
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:14 (IST)

  आरोग्य विभागाची परीक्षा अखेर रद्द
  'क', 'ड' वर्गातील विविध पदांसाठीची परीक्षा रद्द
  हॉल तिकिटात आढळलेल्या अनेक चुका
  आरोग्य विभागाकडून नंतर पुढची तारीख जाहीर होणार
  'न्यूज18 लोकमत' बनलं होता परीक्षार्थींचा आवाज
  शेकडो मुलांनी केल्या होत्या तक्रारी
  खासगी एजन्सीकडून हॉलतिकिटात घोळ
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट

  21:44 (IST)

  ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वं जारी, पुढील आदेशापर्यंत क्षमतेच्या 95 टक्क्यांपर्यंत एलएमओ साठवून ठेवावं

  20:31 (IST)

  नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, आरोग्याच्या नियमांचं मात्र काटेकोर पालन व्हावं - मुख्यमंत्री

  20:8 (IST)

  नालासोपाऱ्यातील आरोपीला हनी ट्रॅप लावून ठाण्यातून ठोकल्या बेड्या, तुळींज पोलिसांची कारवाई

  19:24 (IST)

  चंद्रपूर येथील वन अकादमीचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं - उद्धव ठाकरे

  19:20 (IST)

  राज्यात दिवसभरात 3,286 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू

  19:17 (IST)

  जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का
  11 नगरसेवकांनी शिवसेनेत केला प्रवेश
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
  11 भाजप नगरसेवकांच्या हातावर 'शिवबंधन'
  मुक्ताईनगर, बोदवड नगरपालिकेतील नगरसेवक

  18:23 (IST)

  डीपीडीसी निधीवरून शिवसेना आमदार सुहास कांदेंची काही तक्रार असेल मी नक्की ती सोडवण्याचा प्रयत्न करेन - अजित पवार

  18:11 (IST)

  'इम्पेरिकल डेटाबाबत काल महत्वाची बैठक झाली'
  'मी, मुख्यमंत्री आणि फडणवीसांची बैठक झाली'
  'काही मार्ग निघू शकतो का यावर चर्चा झाली'
  'अभ्यासपूर्ण माहिती मिळाल्यास मार्ग निघू शकतो'
  मुख्यमंत्री आयोगाला पत्र लिहिणार - अजित पवार
  'महिला अत्याचार घटनांबाबत राज्य सरकार गंभीर'
  सर्व गुन्ह्यांत आरोपींना कठोर शिक्षा होणार - अजित पवार

  18:7 (IST)

  आरोग्य विभागाच्या हॉलतिकिटात घोळ, आरोग्यमंत्री टोपेंशी बोललोय, मुलांची गैरसोय होणार नाही, राज्य सरकार नक्की 
  काळजी घेईल - अजित पवार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स