liveLIVE NOW

LIVE: पत्रकार जगतराव उर्फ नाना सोनवणे यांचं अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी निधन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 12, 2021, 20:21 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:57 (IST)

  मुंबई महापालिकेतर्फे सीरो सर्वेक्षण-5 सुरू
  कोरोना संसर्गाचा माग शोधण्यासाठी सीरो सर्वेक्षण
  8 हजार नमुने संकलित करून वैद्यकीय चाचणी होणार
  मुंबई महापालिकेकडून आतापर्यंत चार वेळा सर्वेक्षण

  20:42 (IST)

  परमबीर सिंगांविरोधात खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी लूकआऊट नोटीस जारी तर त्याच गुन्ह्यातील सहआरोपी तोतया पत्रकार बिनुवर्गिसविरोधात नॉनबेलेबल वॉरंट जारी

  20:23 (IST)

  केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रिलायन्स फाऊंडेशनचा मदतीचा हात, 2.5 लाखांचे कोरोना लसीचे डोस मोफत, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

  20:15 (IST)

  नाशिक - 8 लाखांचं लाचखोरी प्रकरण
  फरार वैशाली वीरच्या अडचणीत वाढ
  प्रकरणातील गायब माध्यमिक शिक्षणाधिकारी
  शालेय शिक्षण मंत्रालयानं घेतली गंभीर दखल
  वैशाली वीरचं महाराष्ट्र शासन करणार निलंबन
  सेवा तरतुदीनुसार शिस्तभंग केल्याचा ठपका
  'निलंबन प्रस्ताव तात्काळ सादर करा'
  शिक्षण सचिवांचे शिक्षण आयुक्तांना आदेश

  19:43 (IST)

  पंढरपूरसह 5 तालुक्यांत उद्यापासून 10 दिवस कडक निर्बंध
  पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरसमध्ये निर्बंध
  व्यापारी महासंघानं कडक निर्बंधास केला होता विरोध
  जिल्हाधिकारी - व्यापारी महासंघाची बैठक निष्फळ ठरली

  19:29 (IST)

  अखेर शालेय फीमध्ये 15 टक्के कपात
  सरकारच्या निर्णयानं पालकांना मोठा दिलासा
  राज्य शालेय शिक्षण विभागानं काढले आदेश

  18:59 (IST)

  मी चाळधारकांशी प्रामाणिक आहे, राहीन; 1 जाने. 2021 पर्यंत सर्व रहिवासी पात्र राहतील, यापूर्वी काही अडचणीचे जीआर रद्द करणार - जितेंद्र आव्हाड

  18:57 (IST)

  बीडीडी चाळीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं केलं जाईल, जवळपास सर्व परवानगी मिळालीय, मागण्यांना मर्यादा आहेत हे मान्य केलं पाहिजे, मागण्या करताना तुम्ही इतरांच्या अधिकारांवर गदा येणार नाही ना हे पण बघा - जितेंद्र आव्हाड

  17:21 (IST)

  साक्षी दाभेकरला सर्वोत्कृष्ट कंपनीचा कृत्रिम पाय बसवून पुन्हा तिच्या पायावर उभं करणार, साक्षी आणि प्रतीक्षा दाभेकर यांचं शैक्षणिक पालकत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं, केईएम रुग्णालयात साक्षी आणि प्रतीक्षा दाभेकर या बहिणींची भेट घेऊन दिली आर्थिक मदत

  16:52 (IST)

  नाशिक - 8 लाखांची लाच घेतल्याचं प्रकरण, लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव, लाच प्रकरणात वैशाली झनकर-वीर फरार, अटक टाळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज, अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स