• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • होय मी अहंकारी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला भाजपच्या टीकेवर पलटवार

होय मी अहंकारी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला भाजपच्या टीकेवर पलटवार

जनतेची जागा बिल्डरच्या घशात न घालता ती जनतेसाठीच वापरण्यात येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 डिसेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोना (Coronavirus) परिस्थिती, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन, मुंबईसह राज्यात नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता नाही, अशा विविध मुद्द्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना हात घातला. एवढंच नाही तर सध्या गाजत असलेल्या कांजूरमार्गच्या मेट्रो 3 कारशेडवरून भाजपकडून वारंवार होणाऱ्या टीकेवर होय मी अहंकारी! अशा शब्दांत ठणकावत मुख्यमंत्र्यांनी पलटवर केला.  होय मी अहंकारी आहे. माझ्या मुंबईसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. असं मुख्यमंत्र्यांनी छातीठोकपणे सांगितलं. माझ्या अहंकाराचा प्रश्न मुळीच नाही. पण तुमचीही नसावा, असंही त्यांनी सांगितलं हेही वाचा...अपघात प्रसंगी मोदी सरकारची योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या कसा करता येईल क्लेम  महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी मी आहे. आरे कारशेडची जागा मेट्रो 3 साठी होती. त्यामध्ये आरे कारशेडमध्ये 30 हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्या 30 हेक्टरमध्ये ती जागा वापरणार नाही, असं लिखित दिलं आहे. आता ती जागा वापरणार नाही तर या प्रकल्पामध्ये घेतली कशाला?  ज्या मेट्रोचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यासाठी आणखी जागा लागली तर इतर जागा घेतली जाईल. फक्त एकाच लाईनासाठी कारडेपो का करायचा? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केला. मुख्यमंत्री म्हणाले, राजकीय हल्ले परतवत आरोग्य संकटाशी मुकाबला करत राज्यानं विकास केला आहे. मात्र तरी देखील भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका करणं सुरूच ठेवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अहकांरीपणामुळे राज्याची वाट लागली आहे, अशी टीका भाजपनं केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला. ते म्हणाले. कांजूरमार्ग येथील जमीन ही केंद्र सरकारची असेल, नसेल हा वाद आपण सोडवू शकतो. केंद्रानं राज्याशी चर्चा करून हा वाद सोडवणं अपेक्षीत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही विरोधकांनाही श्रेय द्यायला तयार आहे. पण चर्चा न करता भाजप राजकारण करत असल्याच आरोप त्यांनी यावेळी केला. जनतेची जागा बिल्डरच्या घशात न घालता ती जनतेसाठीच वापरण्यात येत आहे. पुढील 50, 100 वर्षांचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी माझी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कांजूरला 3, 4 आणि 6 या मेट्रोच्या तीन लाईन्ससाठी कारशेड करू शकतो.पहिल्या मेट्रो प्रकल्पात स्टर्लिंग लाईनचा उल्लेख नव्हता, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर साधला. ते म्हणाले, आपण आरेचं जंगल वाचवलं. संजय गांधी हे शहरात बनवलेलं जंगल आहे. हेही वाचा...मराठा आंदोलनात उभी फूट? राज्यव्यापी बैठकीवर मुंबई विभागाचा बहिष्कार मेट्रोसाठी कालांतरानं आरेचं जंगल नष्ट झालं असतं, त्यामुळे राज्य सरकारनं मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता, असंही ते यावेळी म्हणाले. विकास करताना अतिघाई टाळणे गरजेचं असतं. या सर्व गोष्टींमुळे प्रकल्पाचा खर्च वाढतो. नवीन गोष्टी येतात, त्या स्वीकाराव्या लागतात. एखादा प्रकल्प सुरू केला की त्याला विरोध होतो, त्यात काही बदल करावं लागतात. आधीचीच कामे पुढे नेत असल्याची टीका होते, मात्र कामाला स्थगिती द्यायची की पुढे न्यायची ते ठरवा. विकासकामे कुठेही थांबलेली नाहीत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना सांगितलं.
  Published by:Sandip Parolekar
  First published: