मुंबईत रहिवाशी इमारत कोसळली, मृतांची संख्या 9, ढिगाराखाली सापडली गरोदर महिला

मुंबईत रहिवाशी इमारत कोसळली, मृतांची संख्या 9, ढिगाराखाली सापडली गरोदर महिला

मुंबईतील फोर्ट भागातील 5 मजली 'भानुशाली' बिल्डिंगचा एक भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 9 झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै: मुंबईतील फोर्ट भागातील 5 मजली 'भानुशाली' बिल्डिंगचा एक भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 9 झाली आहे. दुसऱ्या दिवशीही ढिगारा उपसण्याचं काम सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही महिला गरोदर होती. तसेच सकाळपासून तीन पुरुषाचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा...'BMCला नागरिकांच्या 'जीवितहानीचा पुरस्कार द्या', भाजप महिला आमदाराची सणसणीत टीका

मिळालेली माहिती अशी की, दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजता भानुशाली या 5 मजली इमारतीचा भाग कोसळला होता. गुरुवारी 5 जणांचा मृत्यू झाला होता तर 23 जणांना वाचवण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशीही ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. सकाळपासून बचाव पथकानं तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यात एका गरोदर महिलेचा समावेश आहे. मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

NDRFचे जवान शोध कार्यात मदत करत आहेत. या कामात कॅमेरा आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत घेण्यात येत आहे. घटनेची भीषणता लक्षात घेवून गुरुवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळाची पाहाणी केली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बीएमसी आयुक्त आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला होता.

धोकादायक होती इमारत...

गुरूवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीच्या मालकाचं नाव मोती भाटीया असं आहे. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती समोर आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही रहिवाशी आणि व्यावसायिक आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत 20 जण होते, असं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि बीएमसीचे आयुक्त इकबालसिंग चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा...सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, CBI ची गरज नाही

दरम्यान, मालाड पश्चिममधील मालवणी भागात गुरूवारी दुपारी अडीचच्या सुमारास तीनमजली चाळीचा भाग कोसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: July 17, 2020, 2:07 PM IST

ताज्या बातम्या