जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Budget 2022: राज्याचा अर्थसंकल्प सादर, पाहा कृषी क्षेत्र अन् शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी काय केल्या घोषणा

Maharashtra Budget 2022: राज्याचा अर्थसंकल्प सादर, पाहा कृषी क्षेत्र अन् शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी काय केल्या घोषणा

Maharashtra Budget 2022: राज्याचा अर्थसंकल्प सादर, पाहा कृषी क्षेत्र अन् शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी काय केल्या घोषणा

Maharashtra Budget 2022: राज्याचा अर्थसंकल्प सादर, पाहा कृषी क्षेत्र अन् शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी काय केल्या घोषणा

Maharashtra Budget 2022-23: आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) आज राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra budget 2022-23) करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. पाहुयात या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे (Maharashtra State budget highlights) कृषी विकास : 1. नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन -दिनांक 6 मार्च 2020 रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणात मी नियमित पीक कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते. पण ही रक्कम आर्थिक अडचणींमुळे वाटप होऊ शकली नाही. मात्र,आज मला आनंद आहे की शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो,कौतुक करतो. या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकरी बांधवांना होईल. त्‍याकरीता सन 2022-23 मधे 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2. भूविकास बँकेची कर्जमाफी- भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करण्याचेही ठरविले आहे. भूविकास बँकांच्या जमिनी व इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार आहे. 3. पंतप्रधान पीक विमा योजना - गुजरात व अन्य काही राज्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून यापूर्वीच बाहेर पडली आहेत. महाविकास आघाडी शासनाने मा.पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून या योजनेमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. ती मान्य झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी आम्हीही अन्य पर्यायांचा विचार करु, असे मी या ठिकाणी स्पष्ट करु इच्छितो. 4. डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना - सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात मी खरीप हंगाम 2021 पासून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याची घोषणा केली होती. या योजनेमुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली असून फेब्रुवारी 2022 अखेर 41 हजार 55 कोटी रुपये कर्जाचे वाटप झाले आहे. सन 2022-23 मधे व्याज सवलत योजनेअंतर्गत 911 कोटी रुपये निधी सुमारे 43 लाख 12 हजार शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. 5. मा.बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र - मा.बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र, वसमत जि.हिंगोली येथे स्थापन करण्यात येईल. या केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता संशोधन करण्यात येणार आहे, त्‍यासाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. 6. सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजना -विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस व सोयाबीन लागवडीचे प्रमाण लक्षणीय आहे. तेथील सर्व शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरीता येत्या ३ वर्षात १ हजार कोटी रुपये निधी देण्यात येईल. 7. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना - मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करुन ते 75 हजार रूपये करण्यात येईल. 8. महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष - सन 2022 हे वर्ष “महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष” म्हणून राबविण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांकरीता कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्के तरतूद वाढवून यापुढे ती 50 टक्के करण्यात येईल. कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या 3 टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करुन देण्यात येईल. 9. मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना- अन्नप्रक्रिया व कृषी मालाच्या मूल्यवर्धनासाठी पुढील 5 वर्षाकरीता “मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया” योजना राबविण्यात येईल. भरड धान्यांवरील कृषिप्रक्रिया व मूल्यवर्धन यावर या योजनेत विशेष भर देण्यात येईल. 10. कृषी विद्यापीठांना विशेष अनुदान - बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली जि. रत्नागिरी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी यांना 50 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना संशोधनाकरीता प्रत्येकी 50 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे यावर आमचा विश्वास आहे कृषी विभागासाठी 3025 कोटींचा निधी प्रस्तावित महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देणार शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 75 हजार अनुदान नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना 50 हजारांचे अनुदान हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार

अन्न प्रक्रिया योजना राबवणार येत्या 2 वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी कृषी संशोधनासाठी अधिकचा निधी पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपये सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार भरड धान्यावर विशेष भर देणार गेल्या वर्षी नियमित वीज बील भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान घोषीत केले पण लागू करता आले नाही. ते या वर्षापासून सुरू करू पीक विम्यासाठी केंद्र सरकारला मदत मागितली आहे, त्यांनी नाही केली तर आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू हळद पीकासाठी विषेश निधी 100 कोटींचे कापूस आणि सोयाबीनसाठी 1000 कोटीचा विशेष निधी शेततळ्यांचे अनुदान 75000 वर नेण्यात येत आहे गोसीखुर्द प्रकल्पासाठी 853 कोटी 60 हजार कृषी पंपांना वीज देणार बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळवली. उत्तर देशी गाई आणि बैल वाढावे यासाठी 3 मोबाइल व्हॅन मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटींचा निधी प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्प सुदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या प्रयोगशाळा उभारणार आरोग्य विभागाला 3364 कोटी रुपये वाचा :  देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब फुसका बार? राष्ट्रवादीने केला मोठा खुलासा आरोग्य विभागासाठी काय? वैद्यकीय पदव्युत्तर संस्था उभारणार 100 खाटांची महिला रुग्णालये तयार करणार येत्या वर्षात 1200 कोटी रुग्णालय खाटांची संख्या वाढवणार युक्रेन मध्ये वैद्यकीय अभ्यासासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारची भरीव योजना वाचा :  विधानसभा अध्यक्षपद निवडणूक: याचिका फेटाळत कोर्टाने गिरीश महाजनांना फटकारलं, अनामत रक्कमही केली जप्त इतर घोषणा हवेलीत संभाजीराजें महाराजांचं स्मारक उभारणार, 250 कोटींची घोषणा स्टार्टअप योजना कौश्यल्य विकास योजना 615 कोटी रुपये मुंबई विद्यापीठ कलीना परीसरात आंतरराष्ट्रीय लता मंगेशकर संगित विद्यालय 100 कोटी रुपये 1600 कोटी रुपये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला प्रत्येक जिल्ह्यात इनोव्शन हब तयार करणार गडचिरोलीला 5000 विद्यार्थ्यांना दर वर्षी कौश्यल्य वर्धनासाठी 30 कोटी रूपये गटार सफाई करण्यासाठी स्वयंचलीत यंत्र आणणार 1619 कोटी रूपये उच्च व तंत्रज्ञान विभागाला या वर्षी देण्यात येत आहे सफाई कामगारांना यापुढे गटार स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलिय यंत्र तृतीय पंथियांना ओळखपत्र आणि शिदापत्र दिले जातील 15000 कोटी रुपये अनूसूचीत जातींच्या कल्याणासाठी. 11 हजार 199 कोटी रूपये आदिवासी विकास कल्याण निधी गडचिरोली माडिया भवन उभारणार 3000 कोटी सामाजीक कल्याण विभागाला 2400 कोटी महिला आणि बाल विकास विभागाला 2472 कोटी रूपये महिला व बालकल्ण्यान विभागाला दिले जातील एसआरएच्या धर्तीवर मुंबईबाहेर झोपड्यांच्या दुरूस्तीसाठी 100 कोटी रूपये 7718 कोटी रुपये ग्रामविकास मंत्रालयाला ग्रामीण भागात 6550 किमीचे रस्ते बांधले जातील. 500 कोटी रुपये कोकण सागरी महामार्गासाठी समृद्धी महामार्गाचे 77 टक्के काम पूर्ण पुढे गडचिरोली गोंदीया पर्यंत वाढवण्यात येत आहे 15773 कोटी रुपये MSRDC ला रस्ते विकासासाठी देणार वसई, भाईंदर जलमार्गाने जोडणार 330 कोटी रूपये मुंबई मेट्रो 3 लाईन नेव्ही नगर पर्यंत विस्तारणार शिवडी नाव्हाशिवा प्रकल्पाचे 64 टक्के काम पूर्ण 3000 पर्यावरण पुरक बस पुरवणार ST महामंडळासाठी 3003 कोटी रुपये नगरविकास विभागाला 8 हजार कोटी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात