Home /News /mumbai /

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक: याचिका फेटाळत कोर्टाने गिरीश महाजनांना फटकारलं, अनामत रक्कमही केली जप्त

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक: याचिका फेटाळत कोर्टाने गिरीश महाजनांना फटकारलं, अनामत रक्कमही केली जप्त

रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक घ्यावी यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच दरम्यान भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती.

मुंबई, 9 मार्च : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा (Maharashtra Assembly Speaker) राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मताने घेण्यासाठी राज्य सरकारने (Mahavikas Aghadi Government) तयारी सुरू केली. मात्र, या निवडणूक प्रक्रियेला भाजपने विरोध केला. या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका भाजपचे आमदार गिरीश महाजन (BJP MLA Girish Mahajan) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने गिरीश महाजन यांना फटकारले आहे. अनामत रक्कमही जप्त या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने आमदार गिरीश महाजन यांना 10 लाख रुपये अनामत रक्कम जमा कऱण्यास सांगितली होती. तर दुसरे याचिकाकर्ते असलेले जनक व्याज यांनाही न्यायालयाने 2 लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितले होते. न्यायालयाने आज या दोघांचीही याचिका फेटाळून लावली असून अनामत रक्कम म्हणून जमा कऱण्यात आलेलले 12 लाख रुपये जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने नेमकं काय म्हटलं? 12 विधानपरिषद आमदार नियुक्त न करणे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाने याचिका फेटाळल्याने भाजप आणि गिरीश महाजन यांच्यासाठी हा एक मोठा झटका आहे. वाचा : अखेर राज्यपाल झाले तयार, थोरातांनी सांगितलं विधानसभा अध्यक्ष निवडणूक कधी होणार! विधान परिषदेच्या नामनिर्देशित 12 आमदारांच्या निवडीवर मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही दोन प्रमुख घटनात्मक पद एकमेकांच्या सोबत नाहीत हे राज्याचं दुर्दैव असल्याचं मतं मुंबई हायकोर्टाने व्यक्त केलं आहे. मात्र या वादातून नुकसान मात्र सर्वसामान्य जनतेचं होतंय. विधानपरिषदेवरील 12 नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीवरून राज्यपालांनी हायकोर्टाच्या मतांचा मान राखायला हवा होता. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आम्हाला पटतच नाही, या निवडीवरून सर्वसामन्य जनतेचं काय नुकसान होतंय? विधानसभा अध्यक्षपदी कोण? संख्याबळ हे महाविकास आघडी सरकारच्या बाजूने असल्याचा दावा महाविकास आघाडी करत आहे. महाविकास आघडीकडे सध्या 171 संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडून अधिकच्या मताने अध्यक्ष होईल असा दावा आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, आता तरी भाजपने समजून घ्यावे. लोकशाही विरोधी ते जे वागतात त्याला चपराक बसली. त्यामुळे आता तरी विधानसभा अध्यक्षांची निवडणुक घ्यावी अशी मी राज्यपालांना विनंती करतो की त्यांनी निवडणूक घ्यावी. तसेच विधान परिषदेच्या नामनिर्देशित 12 आमदारांच्या निवडीबाबतही निर्णय घ्यावा.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Budget, Girish mahajan, Maharashtra, Mumbai high court

पुढील बातम्या