Home /News /maharashtra /

आम्ही एकत्र येऊ; कारण... शरद पवार थकलेत आणि आम्ही सुद्धा!

आम्ही एकत्र येऊ; कारण... शरद पवार थकलेत आणि आम्ही सुद्धा!

'एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. आमच्या मनात खंत आहे त्यांच्याही (पवारांच्या) मनात खंत असेल मात्र ते बोलून दाखवत नाहीत.'

    सोलापूर, 09 ऑक्टोबर: अवघ्या काही दिवसांवर राज्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार याबद्दल विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशात प्रचाराची रणधुमाळीदेखील सुरू झाली आहे. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आजा शरद पवारही थकले आहेत आणि आम्हीही थकलो असल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. ते सोलापुरात एका सभेत बोलत होते. एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. आमच्या मनात खंत आहे त्यांच्याही (पवारांच्या) मनात खंत असेल मात्र ते बोलून दाखवत नाहीत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा ते बोलून दाखवतील. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. मला अटक करूनच दाखवा - शरद पवारांचं आव्हान सरकारने मागील 5 वर्षात सर्वसामान्य माणसाचे हित जपले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. भाजपा आणि सेनेला शेतीतले काही कळत नाही. कांद्याची वाईट अवस्था आहे. सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना सरकारने निर्यात बंदी केली हे सरकारचे शेतकाऱ्यांवरील प्रेम,' असा टोला लगावत शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केलं. इतर बातम्या - राज ठाकरेंच्या अडचणी संपेनात, पुण्याच्या सभेत आणखी एक ख्वाडा? 'हे सरकार सीबीआय, ईडी, पोलीस यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत आहे. पण आम्ही कशाला घाबरत नाही. गुन्हे दाखल करा नाहीतर अटक करा, पण शेतकरी, कामगार, युवक यांच्या प्रश्नांवर आपण बोलत राहू,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारला आव्हान दिलं. निवडणुकीच्या निमित्ताने या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम जनतेने करावं, असं आवाहनही पवार यांनी अहमदनगर इथं प्रचारसभेत बोलताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. विधानसभा प्रचारासाठी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी आज पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. इतर बातम्या - असा आहे मान्सूनच्या परतीचा मार्ग, मुंबईसह या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस!
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Congress-NCP, Maharashtra Assembly Election 2019, Sharad pawar, Solapur City Central s13a249, Sushilkumar shinde

    पुढील बातम्या