गडचिरोली, 9 मे: महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमे माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक शहीद झाला आहे. तर चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांनी काही शस्त्रही जप्त केले आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या राजनांदगाव (छत्तीसगड) जिल्ह्यातल्या मदनवाडाच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये ही चकमक झाली. माओवादी जंगलात लपूनन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
हेही वाचा.. शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO
माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस उपनिरीक्षक शहीद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चार माओवाद्यांचा खात्मा झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर तणाव निर्माण झाला असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यातही सुरक्षा यंत्रणेने माओवाद्यांविरुद्ध मोठी करवाई केली होती. गडचिरोलीमधील कसनपूर भागात महाराष्ट्र पोलिसांनी सर्च मिशन राबवले होते. यात 14 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आला होता. C 60 कमांडो आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली होती.
हेही वाचा.. शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय
जहाल महिला माओवादी ठार
माओवाद्याच्या विभागीय समितीची सदस्य असलेली जहाल महिला माओवादी सृजनक्का चकमकीत ठार झाली. सी सिक्स्टी कमांडो पथकासोबत सिनभट्टीच्या जंगलात माओवाद्यांशी चकमक झाली होती.
माओवादी सृजनक्काच्या मृतदेहासह एके 47 अत्याधुनिक बंदूक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. सृजनक्का हिच्यावरर हत्या, पोलिस दलावर हल्ल्यासह जाळपोळ आणि एकूण 144 गुन्हे दाखल होते. कसनसूर आणि चातगाव या दोन दलमचे नेतृत्त्व सृजनक्काकडे होते.