शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे: राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चालू  शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेऊन  विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे.

शाळांनी वार्षिक फी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांना सक्ती करू नये. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना देण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. फी वाढीबाबत पालकांनी तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा... विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजारास जागतिक महामारी घोषित केलं आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची अमंलबजावणी सुरु आहे. त्याचबरोबर राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशी परिस्थिती सुरु असताना शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना फीस भरण्याची सक्ती करता येणार नाही. काही शाळा पालकांना फी भरण्यास सक्ती करत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सर्व व्यवस्थापनच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू शैक्षणिक वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, असे निर्देश देण्या आले आहेत.

हेही वाचा.. नोकरी गेली तरी नो टेन्शन! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार

दुसरीकडे, दहावी-बारावीच्या राहिलेल्या परीक्षा 1 जुलैपासून घेणार, अशी मोठी घोषणा CBSE ने जाहीर केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. परीक्षा होणार की नाही, इथपासून अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. त्यामुळे मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दहावी आणि बारावीच्या कुठल्या विषयांचे पेपर कधी असतील याचं सविस्तर वेळापत्रक काही वेळात CBSE जाहीर करेल. 1 ते 15 जुलैदरम्यान या रखडलेल्या परीक्षा घेण्यात येतील.

हेही वाचा.. देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा कोरोनाच्या संकटाआधीच पूर्ण झाली. पण दहावीची परीक्षा मात्र पूर्ण होऊ शकली नव्हती. एक पेपर राहिलेला असतानाच लॉकडाऊन सुरू झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. पण राज्य बोर्डाने भूगोलाची परीक्षा पुन्हा घेणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. हा पेपर आता होणार नाही. इतर विषयांच्या गुणावरून सरासरी गुण काढले जातील.

First published: May 9, 2020, 11:21 AM IST

ताज्या बातम्या