शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO

शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO

कुत्र्याला घाबरून बिबट्याने अखेर ठोकली धूम, पाहा VIDEO

  • Share this:

संगमनेर, 09 मे : शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याचीच शिकार होते का वाटत असतानाच तो वाचला. ही घटना घडलीय संगमनेर तालुक्यात वाघापुर गावामध्ये. गावांमध्ये शिरून कोंबड्या, लहान प्राणी फस्त करणाऱ्या बिबट्याला मात्र यावेळी पळताभुई थोडी झाली. शिकारी कुत्र्यानं बिबट्यावर हल्ला केला आणि त्याला पळवून लावलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वाघापूर गव्हाळी वस्ती इथे आण्णासाहेब शिंदे यांच्या घराजवळ सकाळी बिबट्याचे पिल्लू शेतातून वस्तीत शिरताना दिसले. कुत्र्याची नजर त्याच्यावर पडली आणि कुत्र्यानं बिबट्याचा पाठलाग केला. हे पिल्लू कुत्र्याचं उग्र रुप पाहून घाबरून एका शेवरीच्या झाडावर चढलं.

हे वाचा-लॉकडाऊमध्ये ICICI बँकेत निघाला 7 फूट लांब कोब्रा, पाहा थराराक VIDEO

बिबट्याच्या या पिल्लाचा या कुत्रानं चांगलाच पिच्छा पुरवला. कुत्र्यानं बिबट्याच्या पिल्लाला खाली उतरण्याची संधीच दिली नाही. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता. त्यानंतर धाडस करून या पिल्लानं खाली उडी मारली आणि जीव मुठीत घेऊन धूम ठोकली. मात्र कुञ्याने त्याचा पाठलाग करत त्याच्याशी झुंज दिली आणि गावातून पळवून लावलं. तर वारंवार बिबट्या आणि त्याचं हे पिल्लू गावात येत असल्यानं पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हे वाचा-नको ते धाडस पडलं महागात! सिंहासोबत सेल्फी घेणं तरुणाला चांगलंच भोवलं, पाहा VIDEO

First published: May 27, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या