Home /News /maharashtra /

धक्कादायक! महामेट्रोची टेलिफोन लाईन हॅक, अज्ञात भामट्यांनी केले शेकडो इंटरनॅशनल कॉल

धक्कादायक! महामेट्रोची टेलिफोन लाईन हॅक, अज्ञात भामट्यांनी केले शेकडो इंटरनॅशनल कॉल

इंटरनॅशनल कॉल्सचं महामेट्रोला 9 लाख 84 हजार रुपये बिल आल्यानंतर या प्रकरणाचा झाला भंडाफोड

नागपूर, 1 ऑगस्ट: नागपुरात सिव्हिल लाईनमधील मेट्रो हाऊसमध्ये महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे ऑफिस आहे. महामेट्रोची टेलिफोन लाईन हॅक करून अज्ञात भामट्यांनी शेकडो इंटरनॅशनल कॉल केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, 1 ते 31 मार्चदरम्यान महामेट्रोची टेलिफोन लाईन हॅक करून अज्ञात भामट्यांनी शेकडो इंटरनॅशनल कॉल केले होते. या फोन कॉल्सचं महामेट्रोला 9 लाख 84 हजार रुपये बिल आल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे माहिती अधिकारी अखिलेश हळवे यांनी दिली आहे. हेही वाचा...मोठी बातमी! मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू नागपुरात सिव्हिल लाईनमध्ये असलेल्या मेट्रो हाऊसमध्ये महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कार्यालयात अत्याधुनिक उपकरणे आणि टेलिफोन यंत्रणा बसविण्यात आली आहेत. इपीडीएक्स इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयातील टेलिफोन लाईन हॅक करून अज्ञात आरोपींनी देश-विदेशात भरमसाठ कॉल केले. परिणामी मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 1 ते 31 मार्च 2020 या कालावधीत एक महिन्याचे फोनचे बिल 9 लाख 84 हजार 500 रुपये आल्यानं मोठी खळबळ उडाली. एका महिन्याचे एवढं बिल आल्यामुळे याबाबत माहिती घेतली असता महामेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन यंत्रणा हॅक करण्यात आल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे अवघे मेट्रो रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा..मद्यधुंद तरुणानं रेनकोट समजून चोरला PPE सूट, टेस्ट केल्यावर धक्कादायक माहिती समो पोलिसांनी वर्तवला संशय.. या प्रकरणी नागपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून पोलिसांनी दहशतवादाचा संशय व्यक्त आहे. महामेट्रो रेल्वेची टेलिफोन लाईन हॅक करून इंटरनॅशनल कॉल करण्यात आले आहेत. संबंधित आरोपींचा दहशतवाद्यांशी कनेक्शन आहे का? या बाजूनेही पोलिस तपास करत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या