मोठी बातमी! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

मोठी बातमी! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

गेल्या 7 दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)महापौर किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 7 दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकळी त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा..महाराष्ट्र पोलिस कोरोनाच्या विळख्यात, बाधित पोलिसांची धक्कादायक आकडेवारी समोर

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 10320 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या तब्बल दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे. एकट्या मुंबईसह उपनगरात कोरोनाचे 1 लाख 14 हजार 284 रुग्ण आहेत. त्यापैकी 87 हजार 074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 6353 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे ठाणे महापालिका क्षेत्रात 355 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 19075 झाली आहे.

महापौरही झाल्या होत्या 'होम क्वारंटाईन'

दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. BMCच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या.

हेही वाचा...कोरोनात रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरचा भन्नाट जुगाड, नेटकरी म्हणाले..पाहा VIDEO

24 तासांत 232 पोलिसांना कोरोना

गेल्या 24 तासांत 232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 9449 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यात 971 पोलिस अधिकारी तर 8478 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत 9 पोलिस अधिकारी आणि 94 पोलिस कर्मचारी मिळून अशा एकूण 103 पोलिसांचा कोरोनानं बळी घेतला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 1, 2020, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading