मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Lockdown मध्ये राज्यातील लोककलावंतांना दिलासा, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

Lockdown मध्ये राज्यातील लोककलावंतांना दिलासा, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 16 एप्रिल: राज्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांसाठी खुशखबर आहे. त्यांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली आहे. प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात उद्यापासून (शुक्रवार) प्रत्येकी 3 हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजूर असतील किंवा दुर्लक्षित आणि हातावर पोट असणारे असोत यामध्ये सर्वात दुर्लक्षित घटक महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंत आहेत. आता त्यांच्या सगळ्या बार्‍या बंद झाल्या आहेत. यावर्षी कुठेही त्यांना काम मिळणार नाही. या सगळ्याची नोंद भटक्या विमुक्त जातीचे नेते लक्ष्मण माने हे करत आहेत.

हेही वाचा..भाजप नगरसेवकाला 'ओली पार्टी' भोवणार, अपात्रतेच्या कारवाईचे आयुक्तांना निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लोककलावंतांची ही व्यथा लक्ष्मण माने यांनी मांडली होती. त्यानुसार तात्काळ या दुर्लक्षित लोककलावंतांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा उपक्रम हाती घेण्यात येईल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आता राज्यातील वेगवेगळ्या भागात फडामध्ये व अन्य ठिकाणी राहणाऱ्या भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांची यादी, गाव आणि बॅंक खाते यांची नोंदही घेण्यात आली आहे.

हेही वाचा..धोक्याची घंटा! मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 2000 पार, आज 107 नवे रुग्ण दाखल

राज्यातील जवळपास 5 हजार भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांची नोंद झाली असून त्यांच्या बॅंक खात्यात उद्यापासून पहिला टप्पा म्हणून (शुक्रवार) प्रत्येकी 3 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत असेही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार हेमंत टकले यांनी सांगितले आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published:

Tags: Corona, Coronavirus