मुंबई, 16 एप्रिल : राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3000 वर गेली आहे. त्यातच 187 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 3081 कोरोनाबाधितांपैकी (Covid -19) तब्बल 2043 रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 2000 पार गेली ही बाब चिंता वाढवणारी आहे. तर आज मुंबईत 107 नवे रुग्ण दाखल करण्यात आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत मुंबईत एकूण 2043 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाला आहे. आज संशयितांसह 299 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर आज 21 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. यानुसार आतापर्यंत 202 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
107 new COVID19 positive cases, 3 deaths reported in Mumbai today; the total number of positive cases in Mumbai rise to 2043 (including 116 deaths): Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/yhOoRk7Fx7
— ANI (@ANI) April 16, 2020
मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी आज 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आज आणखी 26 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता धारावीत एकूण रुग्णांची संख्या 86 वर पोहोचली आहे. याशिवाय एकाचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंचा आकडा 9 वर गेला आहे. आज नवीन दाखल झालेल्या रुग्णांमध्ये सर्वात लहान वयाचा 13 वर्षांच्या मुलाला कोरोना झाला आहे. मुकुंद नगर आणि मुस्लिम नगर मध्ये प्रत्येकी 18 रुग्ण आढळून आले आहेत.
संबंधित - आता या शहराला घोषित केलं कोरोनाचं हॉटस्पॉट, अत्यावश्यक सेवाही बंद
..तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 4 कोटी 20 लाख डॉलरच्या हॉटेलमध्ये होणार क्वारंटाइन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.