मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रात पुन्हा लागणार Lockdown?, मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत साडेतीन तास बैठक; लवकरच घेणार निर्णय

महाराष्ट्रात पुन्हा लागणार Lockdown?, मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत साडेतीन तास बैठक; लवकरच घेणार निर्णय

महाराष्ट्रात (Maharashtra)  कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.

मुंबई, 31 डिसेंबर: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन ( Lockdown in Maharashtra)होणार का? मुंबईत झपाट्याने (mumbai lockdown)वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे लॉकडाऊन (lockdown) होणार का? असा प्रश्न गुरुवारी वारंवार विचारण्यात आला. मात्र, महाराष्ट्रात याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) घेणार आहेत. सुरक्षेच्या बाबतीत सरकार कोणतीही कमी पडून देणार नसल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी दिले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. कोविड टास्क फोर्ससोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, ती खरोखरच चिंतेची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेऊ शकतात. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत साडेतीन तास बैठक घेत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला.

कोविडची 4000 हून अधिक नवीन प्रकरणे समोर

पॉझिटिव्ह रेटमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचं मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गुरुवारी राज्यात कोविडचे 4000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत, ही चिंतेची बाब आहे. सध्या पॉझिटिव्ह रेट सुमारे 8.48 आहे. कम्युनिटी लेव्हलवर पसार झाला आहे का, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत कम्युनिटी स्प्रेडवर काय परिस्थिती आहे हे स्पष्ट होईल. ते म्हणाले की कोविडचा डबलिंग रेट 2 दिवस आहे, याचा अर्थ आकडे 2 दिवसात दुप्पट होत आहेत. विशेषत: मुंबई, ठाणे, नाशिक, रायगड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथे जलद रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

मुंबईमध्ये गेल्या तीन (Mumbai corona cases) दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे. मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण गुरुवारी बरे झाले आहे.

हेही वाचा-  BREAKING : लग्नाला आता 50 लोकांनाच परवानगी, नवीन नियमावली जाहीर

 दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते. तर बुधवारी एकाच दिवसामध्ये कोरोनाचे 2510 नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या तीन ते चार दिवसांतील आकडेवारीवरून महाराष्ट्रात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईतील प्रमाण सतत 55 टक्क्यांच्या वर नोंदवलं गेलं आहे. मुंबईसाठी ही चिंताजनक बाब असून नागरिकांची काळजी यामुळे वाढली आहे.

First published:
top videos

    Tags: Lockdown, Maharashtra News, Uddhav Thackeray (Politician)