मुंबई, 30 डिसेंबर : राज्यात कोरोना (corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omaicron ) रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतातूर वातावरण आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने (mva government) पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर आता राज्यात सार्वजनिक ठिकाणी (new guidelines for maharashtra) गर्दी करण्यास मनाई करण्यात आली असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पर्यटन ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही नियमावली ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
यापुढे लग्न सोहळा अथवा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असेल तर ५० लोकांची उपस्थितीत बंधनकारक असणार आहे. तसंच, अंत्यसंस्काराला गर्दी टाळण्यासाठी फक्त २० लोकांना यापुढे परवानगी असणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी कलम 144 हे पर्यटनस्ठळी लागू करण्यात आले आहे.
अशी आहे नियमावली!
1. विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
2 सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
3. अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल
4. राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा इतर ठिकाणे आहेत जे समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार
5. आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील
ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्ण आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांची माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी १९८ रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, यामध्ये फक्त 30 जण परदेशातून आलेले आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळले आहेत, पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आलंय. या ३८ जणांचा कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय, अशी माहिती राज्य साथरोग सर्वेक्षण कक्षाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
(नवी मुंबईकरांनो, सोसायटीच्या गच्चीवर थर्टी फस्ट पार्टी केली तर होईल गुन्हा दाखल)
मुंबईमध्ये आतापर्यंत १९० रुग्ण आढळले आहे तर ठाण्यात ४ रुग्ण आढळले आहे. सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरीमध्ये १ रुग्ण आढळला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी ३ रुग्ण आढळून आले आहे. कल्याण डोंबिवलीतील या तिन्ही रुग्णांचा कोणत्याही परदेशी प्रवाशीची नोंद नाही. या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत सर्व रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
तर नाशिकमध्येही एक रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे.
मुंबईत तिसऱ्या दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी!
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण आज बरे झाले आहे.
(अभिनेत्री Monalisa चे बोल्ड फोटो पाहुन चाहते भडकले, म्हणाले...)
दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते. तर बुधवारी एकाच दिवसामध्ये कोरोनाचे 2510 नवे रुग्ण आढळून आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.