डोंबिवलीतील मद्यप्रेमींसाठी अखेर चांगली बातमी, दारू खरेदी करता येणार पण...

डोंबिवलीतील मद्यप्रेमींसाठी अखेर चांगली बातमी, दारू खरेदी करता येणार पण...

राज्य शासनाने ऑनलाइन दारू विक्रीचा जीआर काढल्यानंतर आज कल्याण-डोंबिवलीत ऑनलाइन दारू विक्रीला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 17 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. लॉकडाउनचा चौथा टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे.

या चौथ्या टप्प्यात काही अटी शिथील करण्यात आल्या आहे. राज्य सरकारने वेगवेगळ्या झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यानंतर आता कल्याण आणि डोंबिवली परिसरातही विक्रीला सुरुवात झाली आहे.

राज्य शासनाने ऑनलाइन दारू विक्रीचा जीआर काढल्यानंतर आज कल्याण-डोंबिवलीत ऑनलाइन दारू विक्रीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीत सकाळी दारूच्या दुकाना समोर नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, कल्याण डोंबिवली प्रशासन आणि पोलिसांनी जमावाला  हटवले.

हेही वाचा -मुंबईवरून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण, परभणीतील रुग्णांची संख्या वाढली

कल्याण आणि डोंबिवली परिसरात  ऑनलाइन दारू विक्री सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वेळात करण्यात येणार आहे. प्रत्येक वाईन शॉप मालकांनी दारू विक्री घरपोच देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

त्यामुळे प्रत्येक वाईन्स शॉपबाहेरदारू विक्रीसाठी मोबाइल नंबर देण्यात आले आहे. तर कोणताही गोंधळ उडू नये आणि गर्दी होऊन नये म्हणून पोलिसांनी कडक पहारा ठेवला आहे.

ठाण्यातही घरपोच मद्य विक्री

दरम्यान,  राज्यातील अनेक जिल्ह्यात घरपोच मद्य विक्रीला 15 मेपासून सुरुवात करण्यात आली होती. मात्र, डिलेव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी, ओळखपत्र आणि विविध परवानग्यामुळे घरपोच मद्य विक्री सुरू करता आली नव्हती.

हेही वाचा - पुण्यातल्या कंपनीने शोधली कोरोनावर 3 औषधं, व्हायरसला रोखण्याचा दावा

आता या सगळ्या अटींचं पालन करुन ठाण्यात आज घरपोच मद्य विक्री सुरू केली आहे. ठाण्यातील विविध वाईनशॉप चालकांनी घरपोच दारू देण्यास सुरुवात केली आहे. याकरता वाईनशॉप बाहेर व्हॉट्सअॅप नंबर देखील  देण्यात आले आहे. अशा प्रकारे ठाण्यात जवळपास 30 पेक्षा जास्त वाईनशॉप चालकांनी घरपोच मद्य विक्री सुरू केली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 15 मे या दिवशी 5 हजार 434 जणांनी मद्य खरेदी करता नोंदणी केली होती तर यापैकी 4 हजार 875 जणांना घरपोच मद्य देण्यात आलं आहे. तर 16 मे रोजी 8 हजार 268 जणांना घरपोच मद्य विक्री करण्यात आली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 17, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या