पुण्यातल्या कंपनीने शोधली कोरोनावर 3 औषधं, व्हायरसला रोखण्याचा दावा

पुण्यातल्या कंपनीने शोधली कोरोनावर 3 औषधं, व्हायरसला रोखण्याचा दावा

  • Share this:

पुणे 16 मे: सर्व जगभर सध्या कोरोना व्हायरसवर औषध शोधण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक देशांमधून औषध शोधल्याचा दावाही करण्यात येत आहे. काही कंपन्यांनी मानवी चाचण्याही सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत नोव्होलीड(Novolid) या पुण्याच्या कंपनीने कोरोनावर प्रभावी ठरणारी तीन औषधं शोधल्याचा दावा केला आहे. काही महिन्यांच्या संशोधनानंतर ही तीन औषधं प्रभावी ठरली असून त्याच्या मानवी चाचण्यांसाठी परवानगी मागितल्याचा दावा या कंपनीने केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भारतातल्या रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

कंपनीने म्हटलं आहे की कोरोना व्हायरस विरुद्ध जगभर 2200 औषधांचा वापर करण्यात येतोय. त्या सर्व औषधांचा अभ्यास केल्यानंतर कोरोनावर प्रभावी ठरणारी 3 औषधं मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या औषधांच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मागितली असा दावाही या कंपनीने केला आहे.

पुण्यात कोरोना व्हायरसवर आणि त्यासाठी लागणाऱ्या टेस्ट किटवर अनेक कंपन्या संशोधन करत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे सगळं जग त्रस्त आहे. २ लाखांच्या वर माणसांचा मृत्यू झालाय. तर प्रचंड संख्येने माणसं कोरोनाने ग्रस्त झाली आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढेच ज्यांना कोरोना झाला आहे किंवा नाही अशा माणसांची ओळख पटवणंही करजेचं आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची टेस्ट करावी लागते. त्याला वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. या कामी आता ब्रिटनमध्ये कुत्र्यांची मदत घेता येते का याचा अभ्सास करण्यात येत आहे. त्यात यश मिळालं तर कोरोना रुग्णांचा छडा लावण्यात मदत होणार आहे.

कॅन्सर, मलेरिया, पार्किन्सन असा आजार असलेल्या माणसांना ओळखण्याचं काम कुत्र्यांच्या माध्यमातून करता येतं. जगात अनेक देशांमध्ये ते केलंही जातं. आता अशा काही जातीवंत कुत्र्यांना घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचा छडा लावता येईल का या वर संशोधन सुरू आहे. BBCने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

London School of Hygiene & Tropical Medicine ही संस्था Durham Universityच्या मदतीने हा प्रकल्प राबवत आहे. ब्रिटन सरकारने त्याला मान्यता दिली असून ५ कोटींचा निधीही त्यासाठी देण्यात आला आहे. कुत्र्यांजवळ गंध ओळखण्याची आणि घेण्याची खास क्षमता असते. सुरक्षेसाठीही त्याचा वापर केला जातो.

सोशल डिस्टन्सिंग ठेवाल तरच दिसेल 'ही' जाहिरात, कशी? VIDEO पाहा

त्याचबरोबर चोरांचा माग काढणं, भूसुरूंग ओळखणं, स्फोटकांचा छडा लावणं अशा कामांमध्येही त्यांची मदत होते. पोलीस आणि लष्करामध्ये तर कुत्र्यांचा खास विभागही असतो. याच कौशल्याचा वापर कोरोनासाठी करता येईल का याची चाचपणी करण्यात येत आहे.

 

First published: May 17, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading