मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी...; जामिनानंतर जितेंद्र आव्हाडाची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी...; जामिनानंतर जितेंद्र आव्हाडाची पहिली प्रतिक्रिया

हर हर महादेव चित्रपट प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या चित्रपटाला राज ठाकरेंनी आवाज दिला आहे.

हर हर महादेव चित्रपट प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या चित्रपटाला राज ठाकरेंनी आवाज दिला आहे.

हर हर महादेव चित्रपट प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या चित्रपटाला राज ठाकरेंनी आवाज दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 12 नोव्हेंबर :  मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज जामीन मिळाला. जामीन मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी पुन्हा एकदा जोरदार आरोप केले आहेत. माझ्या अटकेशी पोलिसांचा संबंध नाही.

पोलिसाांच्या डोळ्यात हतबलता दिसत होती. मला चौकशीसाठी पाच वाजता बोलावलं मात्र अडीच वाजताच अटक केली. हे जाणून बूजून करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...

याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. ते चित्रपटात दाखवले जाते त्याला विरोध केले म्हणून जर कारवाई होणार असेल तर मी फासावर पण जायला तयार आहे. हर हर महादेव सिनेमात जाणीवपूर्वक कृष्ण भास्कर कुलकर्णी यांना दाखवले गेले नाही.

या चित्रपटाला राज ठाकरे यांचा आवाज दिला गेला आहे. राज ठाकरे हुशार आहेत मी त्यांच्या पेक्षा छोटा आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी हे मी  सांगणार नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृती करण म्हणजे अस्मितेची आणि मराठी माणसाची विकृती करणं आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा 'चाणक्या'चे पोलिसांना सतत फोन, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

पोलीस हतबल

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला अटक करण्यात आली. त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. पोलिसांच्या डोळ्यात मला हतबलता दिसत होती. त्यांच्यावर दबाव आहे. मला पाच वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यापूर्वीच म्हणजे अडीच वाजता मला अटक करण्यता आली, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांना आज जामीन मिळण्याची शक्यता, 'ही' कारणं आली समोर

आव्हाडांना जामीन 

जितेंद्र आव्हडा यांनी शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एक रात्र पोलीस कोठडीत काढली. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. मात्र त्यानंतर आव्हाड यांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानं आव्हाडांना मोठा दिलासा मिळाला आहे.

First published:

Tags: Jitendra awhad, NCP, Raj thackarey