जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'चाणक्या'चे पोलिसांना सतत फोन, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

'चाणक्या'चे पोलिसांना सतत फोन, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

 आव्हाड यांच्या आरोपांमुळे चाणक्य कोण आहे? अशी चर्चा रंगली आहे.

आव्हाड यांच्या आरोपांमुळे चाणक्य कोण आहे? अशी चर्चा रंगली आहे.

आव्हाड यांच्या आरोपांमुळे चाणक्य कोण आहे? अशी चर्चा रंगली आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 12 नोव्हेंबर : हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चाणक्याचे सतत पोलिसांनी फोन येत आहे, मला जेवण सुद्धा करू दिले नाही, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांच्या आरोपांमुळे चाणक्य कोण आहे? अशी चर्चा रंगली आहे. जितेंद्र आव्हाड यांना आकोर्टात हजर केले  आहे. लोकअदालत असल्यानं पहिल्या सत्रातच आव्हाड यांची सुनावणी सुरू झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी  नातेवाईंकांशी बोलताना नवीन खुलासा केला.  चाणक्याचे सतत पोलिसांना फोन येत आहे. फोनवरुन पोलिसांवर दबाव टाकला जात आहे.  जेवण पण मिळू नये करता प्रयत्न केले जात होते, असा आरोप आव्हाड यांनी केला. त्यामुळ  तो चाणक्य कोण? अशी आव्हाड यांच्या गोटात जोरदार चर्चा सुरू झली आहे. (सेनेला रोखण्यासाठी केसरकर-राणे आले एकत्र, सिंधुदुर्गात ‘या’ निवडणुकीत दिली विजयी सलामी) दरम्यान, सिनेमागृहात मारहाण झालेल्या मनसेचा कार्यकर्ता धुर्वे यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यासह 12 जणांना अटक केली आहे. या सर्व 12 आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे. या गुन्ह्यांच्या तपासकामी पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. तपासात सहकार्य केलं नाही, उत्तरं देण्यास टाळाटाळ, या चित्रपटावर आक्षेप होता तर योग्य कायदेशीर दाद का नाही मागितली? याचा अर्थ हेतू हा सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न आहे का? राज्यातील अनेक सिनेमागृहात सुरू असलेला हा सिनेमा, बंद पाडण्याचं,कारस्थान आहे का? याचा तपास करायचा आहे. प्रेक्षकगृहातील प्रेक्षकांची सुरक्षा धोक्यात आणण्याचे कटकारस्थान आहे, त्याचा सखोल तपास करायचा आहे. (नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी) मॉलमधील चित्रपटगृह चालक यांचे व्यावसायिक नुकसान केले आहे. आरोपींवर इतर गुन्ह्यांचीही नोंद आहे. राजकीय पक्षाचे नेते आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्यानं, हा गुन्हा करण्यामागील मानसिकता काय ? याचा तपास करायचा आहे. काय होऊ शकतं कोर्टात ? पोलीस,जितेंद्र आव्हाड यासह 12 जणांची पोलीस कोठडी मागतील. मात्र, अशा आंदोलन गुन्ह्यात पोलीस कोठडी दिल्या गेल्याचा इतिहास फार कमी असल्याने कोर्ट देऊ शकते न्यायालयीन कोठडी देईल. जर न्यायालयीन कोठडी (MCR) दिली तर लागलीच जामिनासाठी अर्ज सादर केला जाऊ शकतो मालमत्ता नुकसान नसल्यानं,जामीन मंजूर होण्याची शक्यता अधिक आहे. असं होण्याची शक्यता असल्यानं आजच जितेंद्र आव्हाड,आनंद परांजपे यासह सर्व 12 आरोपींना मुक्त होतील. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांवर अधिकची कलमं लावण्यात आली आहे. 141,143,146,149,323 यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 यासह कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात