जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / LIC किंग अशी ओळख असलेल्या राजेंद्र बंबकडे पुन्हा सापडलं घबाड, बँक लॉकरमधून तब्बल 2400 एफडीची कागदपत्रे जप्त

LIC किंग अशी ओळख असलेल्या राजेंद्र बंबकडे पुन्हा सापडलं घबाड, बँक लॉकरमधून तब्बल 2400 एफडीची कागदपत्रे जप्त

LIC किंगच्या बँक लॉकरमध्ये सापडले पुन्हा मोठे घबाड, पतपेढीतील लॉकर उघडताच सर्वच झाले शॉक

LIC किंगच्या बँक लॉकरमध्ये सापडले पुन्हा मोठे घबाड, पतपेढीतील लॉकर उघडताच सर्वच झाले शॉक

Dhule Crime News: एलआयसी किंग अशी ओळख असलेल्या राजेंद्र बंब यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याचे बँक लॉकर तपासण्यात येत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

धुळे, 8 जून : धुळे शहरातील (Dhule City) एलआयसी किंग अशी ओळख असलेल्या राजेंद्र बंब (LIC Agent Rajendra Bamb) या एलआयसी एजंटच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. अवैध सावकारी प्रकरणात त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आणि त्याच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर राजेंद्र बंब याच्या बँक लॉकरची (Rajendra Bamb Bank locker) तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असून आता नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवैध सावकारी करणाऱ्या राजेंद्र बंब याच्याकडे पुन्हा एकदा मोठे घबाड सापडले आहे. मंगळवारी योगेश्वर पतपेढीतील राजेंद्र बंब याच्या लॉकरची पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीत लॉकर्स मधून सुमारे 2 कोटी 47 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. त्यासोबतच 6 लाख किंमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 34 कॉईन जप्त करण्यात आले.

News18

तसेच तब्बल 2400 एफडींचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. या एफडींची किंमत तब्बल 2 कोटींहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

News18

नागरिकांना माहीत नसतांना कागदपत्रे वापरून परस्पर एफडी काढल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जनता बँक लॉकरमध्ये कोट्यवधींचं घबाड यापूर्वी राजेंद्र बंब याच्या जळगाव जनता बँकेतील लॉकर तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली होती. बँक लॉकरमधून तब्बल दोन कोटी 54 लाख रुपयांची रोकड तर 19 लाखांचे सोने जप्त करण्यात आले होते. पहिल्या धाडीत कोट्यवधींचं घबाड हाती आर्थिक गुन्हा शाखेसह अन्य पोलिसांच्या पाच पथकांनी घेतलेल्या झडती पोलिसांना राजेंद्र बंब आणि त्यांच्या कुटूंबियांकडे मोठे घबाड सापडले आहे. राजेंद्र बंब आणि त्यांच्या भावाकडून पोलिसांनी 1 कोटी 42 लाख 19 हजार 550 रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर 46 लाख 22 हजार 378 रुपयांचें दागिने जप्त करण्यात आले आहेत. यासह कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे कागदपत्रांची पोलिसांना सापडले आहेत. राजेंद्र बंब याच्याकडून 38 कोरे धनादेश, 104 खरेदी खत, 13 कोरे मुद्रांक आणि 204 मुदत ठेवीच्या पावत्या सापडले. तब्बल दहा तासांपेक्षा अधिक वेळ झळती नंतर हे घबाड समोर आले आहे. हे घबाड पाहून आणि त्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात