मुंबई, 20 जून : गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांचं आज भवितव्य दिसलं. राज्यसभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच भाजपा सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने पुन्हा एकदा आपल्या सर्व 5 उमेदवारांना यश
विधान परिषद निवडणुक निकालाची (MLC Election result ) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी ठऱला असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
सर्वच पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखत होता. दरम्यान या निवडणूकांचे निकाल
(Legislative Council Election Result) समोर आले असून या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहे. या निवडणूकीतील 10 महत्त्वाच्या गोष्टींवर आपण नजर टाकणार आहोत.
1. एकनाथ खडसेंचं कमबॅक, भाजपला आव्हान-
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ खडसेंकडं पाहिले जाते. १९९०पासून सलग सहावेळा ते मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मुक्ताईनगर भाजपचा आणि खडसेंचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जाऊ लागला. विरोधी पक्षात असताना तब्बल ३० वर्षे खडसे यांनी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष केला. जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा एकनाथ खडसेंना मोठ्या जबाबदारीची अपेक्षा होती, आपली मुख्यमंत्रीपदाची इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आणि त्यांचे नशिबच फिरले. भाजपकडून त्यांना विधानसभेसाठी तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांच्या मुलीला देण्यात आले. या निवडणूकीत त्यांच्या कन्या रक्षा खडसे पराभूत झाल्या. परंतु तेव्हापासून एकनाथ खडसे भाजपवर नाराज होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि आता ते विधानपरिषद निवडणूकीला सामोरे जात होते. या विजयासह एकनाथ खडसेंचं विधानसभेत कमबॅक झालं असून राष्ट्रवादी भविष्यात भाजपविरोधात एकनाथ खडसेंचा वापर करू शकते.
हेही वाचा: MLC Election result : भाजपला धक्का, राष्ट्रवादीनेही घेतला एका मतावर आक्षेप
2. सचिन आहिरेंचा त्याग, शिवसेनेकडून उपकाराची परतफेड-
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केला. 1999 मध्ये सचिन अहिर शिवडी मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते. 2014 मध्ये वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणारे सचिन अहिर 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळी मतदार संघातून निवडणूक लढणार होते. मात्र या मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूकीला सामोरे जात असल्यामुळे त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली. त्यांच्या या त्यागाचं फळ त्यांना मिळालं असून शिवसेनेकडून त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली आहे.
3. राम शिंदे- भाजपचं नवं ओबीसी नेतृत्व?
नगर जिल्ह्यातील भाजपचे नेते प्रा. राम शिंदे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काहीसे बाजूला पडले होते. मात्र पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्यात भाजपला आलेली मरगळ दूर होणार मदत होईल. याशिवाय राम शिंदे यांच्याकडे भाजप ओबीसींचे नवे नेतृत्व म्हणून पाहत आहे.
4. भाई जगताप अन् मुंबई महानगरपालिका निवडणूक-
या निवडणूकीत काँग्रेस नेते भाई जगताप जगताप यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते, कारण त्यांच्यात नेतृत्वाखाली काँग्रेस आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीला सामोरी जाणार आहे. या निकालाचा परिणाम निश्चितच काँग्रेसच्या कामगिरीवर दिसून येईल. भाई जगताप निवडणूकीत पराभूत झाल्यास काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर येईल आणि त्याचा परिणाम आगामी मुंबई महानगरपालिकेवर दिसून येईल.
5. सेनेची मतं फुटली?
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव एकट्या संजय पवार यांचा नसून तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पराभव असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी नोंदवलं होतं. अशा परिस्थितीत या निवडणूकीत सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले. पण शिवसेनेला पहिल्या पसंतीची मतं कमी मिळाली. भाजपला पहिल्या पसंतीची 133 मते तर सेनेला अवघी 52 मतं मिळाली.
6. राष्ट्रवादीची चाणाक्ष खेळी, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत सर्व जागा राखल्या-
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा चाणाक्ष खेळी केली आहे. राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना अगदी पद्धतशीपणे निवडून आणलं. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील सर्वात सुरक्षित आणि चाणाक्ष पक्ष म्हणून समोर आला आहे.
7. रामराजे चौथ्यांदा विधान परिषदेचे सदस्य-
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानपरिषदेत वर्णी लागले आहे. यासह रामराजे चौथ्यांदा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.