जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / MLC Election result : भाजपला धक्का, राष्ट्रवादीनेही घेतला एका मतावर आक्षेप

MLC Election result : भाजपला धक्का, राष्ट्रवादीनेही घेतला एका मतावर आक्षेप

 भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या एका मतावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनेही उमा खापरे यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे

भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या एका मतावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनेही उमा खापरे यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे

भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या एका मतावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनेही उमा खापरे यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election result)  मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे. पण आता मतांवर वरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे. भाजपने आधी रामराजे निंबाळकर यांच्या एका मतावर आक्षेप घेतला आहे. तर आता महाविकास आघाडीने भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भाजपचं एक मत बाजूला ठेवलं आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेरीस दोन तासांच्या विलंबानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. 285 आमदारांची मत वैध ठरली आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आमने सामने आले आहे. भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या एका मतावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनेही उमा खापरे यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. भाजपा उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील मत आहे. मतपत्रिकेवर दोन वेळा गिरवण्यात असल्यानं आढळून आलं आहे. त्यामुळे भाजपाचं एक मत बाजूला ठेवण्यात आलं. त्याआधी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. एका मतावर पेनाने खाडाखोड केली आहे. शेलार यांच्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी मत बाजूला ठेवले आहे.तिसऱ्या पसंतीच्या मतासाठी हे मत होतं. पण, निवडणूक आयोगाचे अधिकारी अजूनही मतांची छाननी करत आहे. एकूण 25 मतं बाकी आहे. तिसऱ्या पसंतीचे मत असेल तर तिसऱ्या राऊंडमध्ये मोजणी केली जाण्याची प्रक्रिया आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात