Home /News /agriculture /

अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान; कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान; कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

काही शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेपोटी कांद्याची साठवणूक केली. मात्र, अवकाळी पावसाने सर्व कांदे खराब झाले. जे शेतकरी 20 ते 25 रुपये किलोने कांदा विकायला तयार नव्हते, त्यांना आता एक रुपये किलोने कांदा विकावा लागत असल्याची स्थिती आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 04 डिसेंबर : उभ्या पिकांपासून ते काढणीला आलेली शेतातील पिके सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) खराब झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी रास्त भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेले कांदे (latest Onion Rate) पाण्यात सडले. त्यातून हिरवे कोंब बाहेर येत आहेत. अशा कांद्याला बाजारात भाव नाही. पंढरपूर बाजार समितीत तर एक रुपया किलो दराने कांदा खरेदी केला गेला. अशा स्थितीत कांदा विकण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी कांदा तसाच पडून ठेवला आहे. महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची (Onion) ही स्थिती झाली आहे. 'टीव्ही 9'ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर बाजार समितीत कांद्याचा भाव 20 ते 25 रुपये किलोने सुरू होता. मात्र, काही शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेपोटी कांद्याची साठवणूक केली. मात्र, अवकाळी पावसाने सर्व कांदे खराब झाले. जे शेतकरी 20 ते 25 रुपये किलोने कांदा विकायला तयार नव्हते, त्यांना आता एक रुपये किलोने कांदा विकावा लागत असल्याची स्थिती आहे. सोलापूर बाजार समितीत एका शेतकऱ्याने 1123 किलो कांदा विकला. त्याबदल्यात त्याला 1665 रुपये मिळाले. मजुरी, वाहतूक आदी खर्च करून 13 रुपये हातात आले. त्याची ही कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा - कोरोनाची लस न घेता दक्षिण आफ्रिका, दुबई व्हाया डोंबिवली, omicron positive रुग्णाची धक्कादायक माहिती! कांद्याला एमएसपीच्या कक्षेत आणण्याची मागणी उन्हाळ्यात कांद्याला मोठी मागणी होती. त्यानंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्यास अवधी शिल्लक होता. तेव्हा कांद्याला 20 ते 30 रुपये किलो भाव मिळत होता. मात्र, आता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत सध्या या भिजलेल्या कांद्याला योग्य दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने, पुढे जाऊन शहरी मध्यम व गरीब वर्गातील लोकांवर महागाईचा बोजा वाढणार आहे. हे वाचा - मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना; ग्रामपंचायतींना या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पीक न आल्याने बाजारात कांद्याची आवक घटली तर बाजारात कांद्याचे भाव लगेचच वाढतात. एकीकडे बाजारातील अनियमितता आणि दुसरीकडे निसर्गाचा कहर, या दोन्हीच्या परिणामामुळे खेड्यापाड्यात शेतकरी हैराण झाला आहे, तर शहरांमध्ये गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय त्रस्त आहेत. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा एमएसपीच्या कक्षेत आणण्याची मागणी सुरू केली आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांद्याचे दर -
  कांदा Rate Per Unit in Rs.
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  04/12/2021 अहमदनगर लाल क्विंटल 710 200 2500 1500
  04/12/2021 अहमदनगर उन्हाळी क्विंटल 10857 600 2592 2050
  04/12/2021 औरंगाबाद --- क्विंटल 876 400 1400 900
  04/12/2021 औरंगाबाद उन्हाळी क्विंटल 361 500 2250 1650
  04/12/2021 चंद्रपुर पांढरा क्विंटल 144 2500 3500 3000
  04/12/2021 जळगाव लाल क्विंटल 1466 1000 1650 1413
  04/12/2021 कोल्हापूर --- क्विंटल 4292 700 3400 1600
  04/12/2021 कोल्हापूर लोकल क्विंटल 26 1400 2000 1800
  04/12/2021 नागपूर लाल क्विंटल 180 1000 2000 1750
  04/12/2021 नागपूर पांढरा क्विंटल 100 2000 2500 2375
  04/12/2021 नाशिक लाल क्विंटल 5455 800 2951 2100
  04/12/2021 नाशिक उन्हाळी क्विंटल 24164 592 2808 1959
  04/12/2021 नाशिक पोळ क्विंटल 45 850 3100 1800
  04/12/2021 पुणे लोकल क्विंटल 236 967 2233 1567
  04/12/2021 सांगली लोकल क्विंटल 2438 1000 2800 1900
  04/12/2021 सातारा लोकल क्विंटल 15 1000 2800 1800
  04/12/2021 सातारा हालवा क्विंटल 99 500 3300 3300
  04/12/2021 सोलापूर लाल क्विंटल 307 70 3200 1900
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 51771
  दर सौजन्य - महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Onion, Priceonion

  पुढील बातम्या