जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लातूरचा नवा पॅटर्न, क्लासेसच्या परिसरातच पोरं झाली झिंगाट, पोलिसांनी रात्रीच काढली वरात

लातूरचा नवा पॅटर्न, क्लासेसच्या परिसरातच पोरं झाली झिंगाट, पोलिसांनी रात्रीच काढली वरात

शहरातील विविध भागात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व खाजगी क्लासेस भागातील विनाकारण फिरणाऱ्या 40 युवकांना ताब्यात घेण्यात आले.

शहरातील विविध भागात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व खाजगी क्लासेस भागातील विनाकारण फिरणाऱ्या 40 युवकांना ताब्यात घेण्यात आले.

शहरातील विविध भागात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व खाजगी क्लासेस भागातील विनाकारण फिरणाऱ्या 40 युवकांना ताब्यात घेण्यात आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

लातूर, 05 मार्च : लातूरमध्ये (latur) गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन (drinking alcohol) तरुणांनी उच्छाद मांडला आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर अखेरीस लातूर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.  शहरात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व आरडाओरडा करणाऱ्या 40 मद्यपींवर पोलिसांनी (latur police) कारवाई केली आहे. लातूर शहरात दररोज ठिकठिकाणी युवक उघड्यावर मोकळ्या जागेमध्ये, रस्त्याच्या कडेला, अंधाराचा फायदा घेऊन मद्यपान व नशापाणी करीत असताना आढळले. याबाबतच्या अनेक तक्रारी देखील पोलिसांत येत होत्या त्यानुसार लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. ( इतका राग होता तर मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेचा सवाल ) शीघ्र कृती दलाचे जवान, दंगा नियंत्रण पोलीस पथकाचे प्लाटून तसेच विवेकानंद पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक असे मिळून वेगवेगळी पथके तयार करून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी शहरातील विविध भागात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व खाजगी क्लासेस भागातील विनाकारण फिरणाऱ्या 40 युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कलम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. लातुरात आजपर्यंतच्या काळात अशा स्वरूपाची पहिलीच कारवाई असल्यानं तळीरामांचे धाबे मात्र दणाणले आहेत. ( आशुतोषचा अपमान केला म्हणुन अरुंधती लगावणार अभिच्या कानाखाली ) अशा प्रकारची कार्यवाही यानंतरही पुढे चालू राहणार असून उघड्यावर मद्यप्राशन करून सामाजिक शांतता भंग करणारे व्यक्तींची माहिती डायल 112 किंवा संबंधित पोलिस स्टेशनला देण्यात यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात