मुंबई, 5 मार्च- आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. मालिकेत लवकरच एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अरुंधतीचं नवीन रूप सर्वांना पाहायला मिळणार आहे. आपाल्याच मुलाच्या कानाखाली लगावताना ती दिसणार आहे. याचं कारण देखील तसंच आहे, मित्र आशुतोषचा सर्वांसमोर अपमान केल्याबद्दल अरुंधती अभिच्या कानाखाली (Aai kuthe kay karte latest episode) लगावणार आहे. यावर अभिसह घरातील सर्वांची प्रतिक्रिया असणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, आशुतोषचा सगळ्यांसमोर अपमान केला म्हणुन, अरुंधती लगावणार अभिच्या कानाखाली, दाखवणार त्याला त्याची जागा! अरुंधती आता हक्कासाठी लढताना दिसते. साधीभोळी अरुंधती आता स्वताची बाजू मांडताना दिसते. आता तर तिला देशमुखांनी घरातून देखील बेदखल केलं आहे. खऱ्या अर्थाने तिचा एकटीचा प्रवास सुरू झाला आहे. असं जरी असलं तरी देशमुख कुटुंबातील काही मंडळी तिला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही.
चारित्र्याचा संशय घेऊन तिला घऱातून बाहेर काढलं आहे. अशावेळी तिच्या मदतीला मित्र आशुतोष धावून आला. त्याच्या मदतीनं तिला हक्काचे नवीन घर मिळालं आहे. या सगळ्या कठीण काळात तिला नोकरी असेल तिच्यातील आत्मविश्वासाची जाणीव करून दिली असेल तर तो आशुतोष आहे. पण याच मित्राचा अपमान होताना पाहून ती आता मोठ पाऊल उचलणार आहे. वाचा- PHOTO: आहाराचा फोटो शेअर करत Shilpa Shetty ने सांगितलं फिटनेसचं रहस्य यापूर्वीही अभिच्या लग्नात अनिरुद्धकडून आशुतोषचा अपमान करण्यात आला होता. त्यावेळी देखील तिनं सर्वांसमोर आशुतोषची बाजू घेतली होती. आता तिनं तिच्या मुलाच्या कानाखाली लगावली आहे. यावर अनिरुद्ध, कांचन आणि संजना यांची प्रतिक्रिया नेमकी काय असणार हे देखील पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. या नवीन ट्विस्टचा उलगडा मात्र येणाऱ्या भागातच होणार आहे हे नक्की.