मुंबई, 5 मार्च- नागराज मंजुळे यांचा झुंड**( jhund )** हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. झुंड चित्रपट पाहून अनेक बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. अनेक दिग्दर्शकांनी हा चित्रपट ऑस्करसाठी जायला पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. तर आमिर खानने देखील नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे. या सगळ्यात आता प्रसिद्ध लेखिका (shefali vaidya ) शैफाली वैद्य यांनी या सिनेमा संदर्भात केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. शैफाली वैद्य यांनी फेसबुसक पोस्ट करत म्हटलं आहे की, . इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ **(amitabh bachchan )**कशाला? असा सवाल शेफाली वैद्य यांनी केला आहे. त्यांच्या या सवालावर अनेकांनी विरोध दर्शवत नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. वाचा- Prabhas ‘या’ महिन्यात करणार लग्न, आचार्य विनोद कुमार यांची मोठी भविष्यवाणी एका नेटकऱ्याने शैफाली यांच्या पोस्टवर आक्षेप नोंदवत म्हटलं आहे की, Rishikesh Raut अरे पण मेसेज तर चांगला देत आहेत ना फिल्म मधून की, झोपडपट्टीतील मुलांना समान संधी मिळायला हवी आणि ती मिळाली तर ती मुलं देखील तितकच चांगल करून दाखवू शकतात. मला वाटतं त्या मेसेज कडे पाहायला हवं ना ? की मुख्य भूमिकेत प्रस्थापित अमिताभ आहे आणि इतर भूमिकेत दुर्लक्षित आहेत वगैरे.. चित्रपट निर्मिती ही एक कला आहे तिथे, डायरेक्टर स्वतःचा मेसेज किंवा स्टोरी सर्वांपर्यंत पोहचावा म्हणून भूमिका कोण चांगली करेल याचा विचार करत असतो. त्याचं काम त्याला करुद्या की. तुमच्या पोस्ट वर कुणी काही लिहिलं किंवा वेगळं मत मांडलं की तुम्ही म्हणता वाचायचं असेल तर वाचा नाहीतर निघा.. नागराज च्या चित्रपटावर तुम्ही तुमचं मत मांडताय, तुम्हाला चित्रपट बघायचा असेल तर बघा नाहीतर निघा .. नाई का ? 😂 डायरेक्टर ला ठरवुद्या की कुणाला घ्यायचं भूमिकेत ? तुम्ही कोण विचारणाऱ्या कशाला अमिताभ ? तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, मित्रांनो शेफाली वैध्य ह्या अंधभक्त आहेत,.. अंधभक्तांना कोणत्याही विषयावर गोबर ज्ञान पाजळायची सवय असते.शेफाली सारख्याना समाजामध्ये द्वेष पसरायला नेहमी आवडते…Neglet… अशा कमेंट करत नेटकऱ्यांना नागराज यांना पाठींबा दिला आहे.
शेफाली वैद्य यांनी ‘नो बिंदी नो बिजनेस’ ही मोहीम राबवली होती, त्यामुळे शेफाली वैद्य चर्चेत आल्या होत्या. ज्या जाहिरातींमध्ये मॉडेल्सच्या कपाळावर टिकली नसेल त्या वस्तूची मी खरेदी करणार नाही अशी ही मोहिम देशभरात प्रचलित झाली होती. यामुळे त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या होत्या.