जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur Gram Panchayat Election : पत्नीला सरपंच करण्यासाठी जिवाचे राण केलं अन् प्रचारातचं मृत्यूने गाठलं

Latur Gram Panchayat Election : पत्नीला सरपंच करण्यासाठी जिवाचे राण केलं अन् प्रचारातचं मृत्यूने गाठलं

Latur Gram Panchayat Election : पत्नीला सरपंच करण्यासाठी जिवाचे राण केलं अन् प्रचारातचं मृत्यूने गाठलं

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा मोसम सुरू असल्याने ताण, भुक, आरोग्य हरपून जोतो आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

लातूर, 16 डिसेंबर : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा मोसम सुरू असल्याने ताण, भुक, आरोग्य हरपून जोतो आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यातील सगळ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवडणुकांचा फेवर चढल्याने प्रचार सभा होत आहेत. लातूर जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. परंतु लातूर जिल्ह्यातील मुरूडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात

मुरूडमध्ये महिला सरपंच पदाचे आरक्षण असल्याने उभे असलेल्या पत्नीच्या प्रचारसभेत भाषण संपवून खूर्चीवर बसताच पतीला ह्रदयविकाराचा धक्का आल्याने मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा :  सोलापुरात शिंदे, भाजप, मनसे गटाला खिंडार, मोठ्या संख्येने ठाकरे गटात परतले

लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूका सुरू आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची रंगत सुरू असतानाच प्रचारसभेतील भाषणादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरूड ग्रामपंचायतीत महिला आरक्षण असल्याने सरपंच पदाच्या उमेदवार पत्नीच्या प्रचारादरम्यान अमर नाडे हे खुर्चीवर बसले. यावेळी त्यांना छातीत दुखत असल्याचे त्यांनी स्टेजवरच पत्नीच्या कानात सांगितले. मात्र, काही कळायच्या  तिथेच पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

अमर नाडे यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरुडच्या सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत. काल सायंकाळी त्यांच्या प्रचाराच्या वेळी अमर नाडे यांच्या छातीत कळ आली, यावेळी स्टेजवर एकच गोंधळ उडाला यानंतर उपस्थितापैंकी काही जणांनी नाडे यांना रुग्णालयात दाखल केले, यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

लातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुुरुड ग्रामपंचायतीमध्ये नाडे काका-पुतण्याची गेल्या काही वर्षांपासून सत्ता आहे. मात्र, यंदा अमर नाडे यांनी काका दिलीप नाडे यांच्या विरोधात पॅनल उभे करत निवडणुकीत पॅनल उतरवले होते. यावेळी काकांच्या विरोधात प्रचार करत असताना त्यांनी दिलीप नाडेंवर जोरदार हल्लाबोल केला. जवळपास 25 मिनिटे भाषण केल्यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र म्हणत आपले भाषण संपवले. मात्र, अमर नाडे यांचा हा जय महाराष्ट्र त्यांच्या जीवनातील अखेरचा ठरला.

जाहिरात

हे ही वाचा :  कोकणात राजकीय शिमगा? मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते लावणार हजेरी?

भाषण संपवून खूर्चीवर बसताच अमर नाडे यांच्या छातीत कळ आल्याचे त्यांनी पत्नीस सांगितले, पत्नी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करेपर्यंत ते ग्लानी आल्याप्रमाणे खुर्चीवरुन सरकले. त्यानंतर स्टेजवर एकच धावपळ झाली. अमर हे खुर्चीवरुन खाली सरकले आणि त्यांनी मान टाकल्यानंतर काही जण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. ​​​​​​मात्र, त्यांना रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा प्राणज्योत मालावली होती.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात