मुंबई, 29 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देण्याची एकीकडे तयारी सुरू आहे तर दुसरीकडे नव्या वर्षात पुन्हा एकदा कोरोनाचे (corona) आणि ओमायक्रॉनचे (Omicron Variant) संकट येऊन उभे ठाकले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज एकाच दिवसात 85 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना रुग्णाबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. आज राज्यात तब्बल ८५ ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये मुंबईत ३४, नागपूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहे. पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॅान रूग्णांचा आकडा आता २५२ वर पोहोचला आहे. ( Khajuraho मंदिरांवर कोरलेल्या कामक्रीडा मूर्तींमागचं रहस्य माहितीय का? ) तर दुसरीकडे नागपूरमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसंच ओमयक्रॉनचे 3 रुग्ण आढळले. मागच्या एक आठवड्याचा विचार करायचं झालं तर 28 डिसेंबरला 44 रुग्ण, 27 डिसेंबर 12 रुग्ण, 26 डिसेंबरला 32 रुग्ण, 25 डिसेंबरला 24 रुग्ण, 24 डिसेंबरला 12 रुग्ण आढळले. ज्याप्रकारे मागच्या दहा दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा ग्राफ वर जाताना दिसत आहे. त्यामुळे नागपूरकरांना पहिल्या व दुसऱ्या लाटेचे आठवण येत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत अशाच प्रकारे दिवाळी नंतर हळूहळू वाढायला सुरुवात झाली होती. दुसऱ्याला लाटेत हा ग्राफ 24 एप्रिल 2021 रोजी दिवसाला 8999 वर पोहचला होता. त्यामुळे तज्ञांकडून भीती व्यक्त केली जात आहे जिल्हा प्रशासनाने मागच्याच आठवड्यात नागपूर मध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. राज्यात 3900 रुग्ण तर मुंबईत 2510 वर आकडा! तर आज राज्यात 3900 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या 24 तासामध्ये 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2900 रुग्णांपैकी मुंबईत 2510 रुग्णांची नोंद झाली आहे.मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. आज एकाच दिवसामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण २५१० आढळून आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या २ हजार पार आल्यामुळे चिंतेत भर घातली आहे. (IND vs SA : विराटने पुन्हा केली तिच चूक, कॉमेंट्री करताना गावसकर झाले नाराज ) मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते. गेल्या तीन ते चार दिवसांतील आकडेवारीवरून महाराष्ट्रात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईतील प्रमाण सतत 55 टक्क्यांच्या वर नोंदवलं गेलं आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार ते 77 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईसाठी ही चिंताजनक बाब असून नागरिकांची काळजी यामुळे वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.