शिवसेनेचा गड काबीज करण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला यश, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम 29 हजार 297 मतांनी विजयी.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 12:27 PM IST

शिवसेनेचा गड काबीज करण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला यश, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

चिपळूण, 24 ऑक्टोबर: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आपलं खातं उघडत पहिला विजय मिळवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी काँटे की टक्कर आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांनी चिपळूण मतदारसंघात आपलं पहिलं खातं उघडलं आहे. राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी 1 लाख 520 मतं मिळाली असून शिवसेना उमेदवार सदानंद चव्हाण यांच्यावर 29 हजार 297 मतांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना 71 हजार 223 मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराला धूळ चारत राष्ट्रवादीचे उमेदवार निकम यांनी 29 हजार 297  मतांनी बाजी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. चिपळूण मतदारसंघात शेखर निकम समर्थकांनी फटाके फोडून गुलाल उधळला आहे.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात 2014 साली काँटे की टक्कर’ लढत होऊन शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या शेखर निकमांवर 6 हजार मतांनी निसटता विजय मिळवला. यावेळीही हेच दोन उमेदवार आमनेसामने होते. जिल्हय़ातील हायहोल्टेज लढत म्हणून चिपळूणकडे पाहिले जात होतं.  शिवसेनेचा गड असलेल्या चिपळूण मतदारसंघ काबीज करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

Loading...

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

LIVE VIDEO : नितेश राणे जिंकले, सेनेला टोला लगावत निलेश यांनी केला जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 12:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...