विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 22 मार्च: ध्येयवादी दृष्टिकोन, प्रचंड जिद्द आणि अभ्यासातील सातत्य या त्रि-सुत्रीच्या आधारे एखादी व्यक्ती चांगले यश संपादन करू शकते. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवकाच्या मुलाने MPSC परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. करवीर तालक्यातील म्हाळुंगे या लहानशा गावातील विश्वजीत जालंधर गाताडे यांनी राज्यात 11 वा तर ओबीसीमधून तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. कुटूबांचे अपार कष्ट अन् विश्वजीतचे यश विश्वजीतचे वडील जालंदर गाताडे हे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. तर आई जयश्री गाताडे या गृहीणी आहेत. आजोबांनी गावोगावी फिरस्ती करून छोटे-छोटे व्यापार करीत कुटुंबाला सावरले. मुलाला खूप शिकवायचे अशी आई आणि वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे कष्ट घेऊन शिक्षण दिले. जेमतेम अर्थार्जनातून प्रगती असे माझ्या कुटुंबाचे सूत्र होते. या यशात आई वडिलांबरोबर चुलते रविंद्र गाताडे, चुलती पुष्पा गाताडे, मामा विजय फल्ले, अमोल फल्ले तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा वाटा आहे, असे विश्वजीत सांगतात.
शालेय शिक्षणापासूनच दाखवली चुणूक मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणे विश्वजीत गाताडेचा शैक्षणिक प्रवास घडलेला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले. पहिलीपासून हुशार असलेल्या विश्वजीत यांनी चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावला. माध्यमिक शिक्षण बाहेर कुठे न घेता गावातीलच राजश्री शाहू हायस्कूल मध्ये घेतले. तिथे देखील आपली यशाची कमान उंचावत ठेवत दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण घेत केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला. MPSC Success Story: मुलीनं पांग फेडलं! कारखान्यातील मजुराची लेक झाली क्लास वन अधिकारी! Video स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला दहावीला केंद्रात आलेला विद्यार्थी निश्चितच इंजिनियर, डॉक्टर अशा विविध क्षेत्रात करिअर करतो. मात्र याला फाटा देऊन स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी व्हावे, असे स्वप्न विश्वजीतने निश्चित केले. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. संख्याशास्त्र विषयातून बीएससी पूर्ण केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेवर पूर्णवेळ लक्ष केंद्रीत केले. कष्ट घेण्याची प्रचंड मानसिकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि अभ्यासातील सातत्य या बळावरती सेल्फ स्टडीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2020 च्या MPSC परीक्षेत यश कोरोना महामारीच्या काळात सुद्धा अभ्यासात खंड पडू नये म्हणून राहत्या घरी स्वतंत्र खोलीत अभ्यास सुरू ठेवला. 2020 च्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कष्टाला फळ मिळाले. पहिल्याच प्रयत्नात राज्यात 12 व्या क्रमांक पटकावला. मात्र, उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी अभ्यास सुरूच ठेवला. दरम्यानच्या काळात 2021 ची राज्यसेवा परीक्षा दिली. वडिलांच्या नंतर आईनं दिली साथ, आव्हानांवर मात करत केदारनं उघडलं राज्यसेवेचं दार! Video दुहेरी यशाला गवसणी स्पर्धा परीक्षेचा मार्ग तसा खडतर आणि संयमाची सचोटी बघणारा असतो. त्यात हल्लीच्या स्पर्धात्मक युगात एकदा यश संपादन करणे ही फार मोठी बाब मानली जाते. मात्र याच एमपीएससी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा यशाला गवसणी घालून ओबीसी वर्गातून राज्यात तिसरा येण्याचा मान विश्वजीत गाताडे यांनी पटकावला आहे. तर एकूणात राज्यात 11 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे विश्वजीत सांगतात. MPSC Success Story : प्राथमिक शिक्षकाचा मुलगा राज्यात दुसरा! कोल्हापूरच्या शुभमच्या यशाचं पाहा रहस्य, Video यशाचा मूलमंत्र सेल्फ स्टडी स्पर्धा परीक्षेत दोनदा यश मिळवणाऱ्या विश्वजीत यांनी कोणतीही खासगी क्लास लावला नाही. सेल्फ स्टडी हाच त्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे. अभ्यासासाठी त्यांनी इंटनेटचा पुरेपूर वापर केला. घरीच राहून विविध पुस्तके, युट्युब, टेलिग्राम अशा माध्यमांतून त्यांनी अभ्यास केला. सेल्फ स्टडीतूनच विश्वजीत यांनी दुहेरी यश संपादन केले असून आता उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.