जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MPSC Success Story: मुलीनं पांग फेडलं! कारखान्यातील मजुराची लेक झाली क्लास वन अधिकारी! Video

MPSC Success Story: मुलीनं पांग फेडलं! कारखान्यातील मजुराची लेक झाली क्लास वन अधिकारी! Video

MPSC Success Story: मुलीनं पांग फेडलं! कारखान्यातील मजुराची लेक झाली क्लास वन अधिकारी! Video

MPSC Success Story: कोल्हापूर जिल्ह्यातील कौलगेची श्रद्धा चव्हाण राज्यसेवा परीक्षेत राज्यात चौथी आली आहे. सलग दुसऱ्यांदा तिने यशाला गवसणी घातली आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 16 मार्च: स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय नोकरी मिळवण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. मात्र यात प्रत्येकाला यश मिळंलच असं नाही. स्पर्धा परीक्षांचा मार्ग तस्सा खडतर आणि संयमाची सचोटी बघणारा आहे. यात एकदा यश मिळवणंही फार मोठी गोष्ट मानली जाते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या कौलगे या लहानशा गावातील श्रद्धा चव्हाण यांनी सलग दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. MPSC परीक्षेत मुलींमध्ये राज्यात चौथी नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत श्रद्धा चव्हाण हिनं मुलींमध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावला. तर एकूण गुणवत्ता यादीत 88 वे स्थान मिळविले आहे. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभ्यासात सातत्य, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश संपादन करणं फार अवघड नाही, हेच श्रद्धा चव्हाण हिनं तिच्या प्रेरणादायी प्रवासातून सिद्ध केलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    यापूर्वी उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नात श्रद्धा चव्हाण यांनी यश संपादन केले होते. त्यात त्यांची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली होती. सध्या या पदाचे त्या प्रशिक्षण घेत आहेत. तत्पूर्वीच, त्यांनी 2021ची राज्यसेवेची पुन्हा परीक्षा दिली होती. त्यात सलग दुसऱ्या परीक्षेत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. वडील साखर कारखान्यात कामाला श्रद्धा सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. वडील साखर कारखान्यात नोकरी करतात. तर आई गृहिणी आहे. श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावातीलच माध्यमिक शाळेत झाले. तिने साधना ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिवराज महाविद्यालयातून रसायनशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर तिने शिवाजी विद्यापीठातून एमएस्सी पूर्ण केले. गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये मजूर म्हणून काम करत असलेले वडील शंकर चव्हाण यांनी मोठ्या कष्टाने आणि मुलीवर पूर्ण विश्वास ठेवत श्रद्धा यांच्या शिक्षणाची पायभरणी केली. या संपूर्ण यशाचे श्रेय श्रद्धा आई वडिलांना देते. MPSC Success Story: वडील शेतकरी, जालन्याचा शशिकांत क्लास वन अधिकारी!, पाहा Video झोकून देऊन केली तयारी महाविद्यायामध्ये शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करून ‘क्लास वन’चे पद मिळवावे हे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी स्वतःला झोकून देत मी या परीक्षेसाठी तयारी केली. परिणामी घरापासून काही काळ लांब देखील राहिले. या प्रवासात माझ्या घरच्यांनी, शालेय, महाविद्यालयीन शिक्षक, तालुक्यातील यशस्वी अधिकारी, मित्र परिवार वर्ग यांची खूप मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले, असे श्रद्धा यांनी सांगतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात