कोल्हापूर, 24 जुलै : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पन्हाळा गडावर अघोरी प्रकार घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. (Panahala Fort) शिवरायांनी तीन महिने ज्या गडावर आपले वास्तव्य केले त्याच गडावर काही समाजकंटक खुलेआम दारू ढोसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या दारुड्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी पन्हाळा गडावर येऊन त्या दारुड्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
पन्हाळगडावर गडावरील झुणका भाकर केंद्रांमध्ये काही पर्यटकांनी दारू ढोसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या विरोधात राज्यातील शिवप्रेमींनी निषेधाबरोबर संताप व्यक्त केला. दरम्यान मागच्या काही काळात राज्यातील किल्ल्यांची वारंवार पडझड होत आहे मात्र पुरातत्व विभागाने याबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने शिवप्रेमींनी पुरातत्व विभागावर नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा : शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी आमदारासह अनेक नगरसेवक आज शिंदेत गटात सामील होणार
पन्हाळगडावर खुलेआम दारू पार्टी होत असून गडाचे पावित्र्य धोक्यात आले आहे pic.twitter.com/eQxo8m5wiH
— sachin (@RamDhumalepatil) July 24, 2022
पावनखिंड येथील घटना ताजी असतानाच दुसरा प्रकार
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहूवाडी या दोन तालुक्यामध्ये असणाऱ्या पावनखिंडमध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा आहेत. सिद्दीच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी पावनखिंडीतून शिवराय विशाळगडावर पोहोचले होते यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांनी बलिदान दिल्याने पावनखिंडीत प्रत्येक वर्षी रणसंग्राम दिवस साजरा केला जातो. दरम्यान काही मद्यपी मद्यपान करून पवित्र स्थानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याने मद्यपींना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिला.
या व्हिडीओमध्ये शिवभक्तांनी चांगलीच धुलाई केल्याचे दिसून येत आहे. काही शिवभक्त लाथाबुक्यांनी मद्यपींना मारत असल्याचे स्पष्ट व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. रणसंग्राम दिवशी हजारो शिवभक्त वंदन करण्यासाठी येतात परंतु काही मद्यपी येथे आल्याने शिवप्रेमींना संताप अनावर झाल्याने मद्यपींना चांगलीच अद्दल घडवल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा आणि विशाळगडावर असे वारंवार प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. झालेल्या घटनेत मद्यपींना कान पकडून माफी मागावी लावल्यानंतर प्रकरण शांत झाले.
हे ही वाचा :सोलापूरमध्ये एसटी बस पलटली, 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर
राज्यभरातील जे गडकिल्ले आहेत त्यांची डागडुजी करण्यात यावी, त्यांची पडझड रोखावी अशी एकमुखाने मागणी शिवभक्तांनी केली. या ठिकाणी राज्यभरातून शिवभक्त एकत्र झाले होते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक किल्ला विशाळगड आहे त्या ठिकाणी सुद्धा काही दिवसांपूर्वी बुरुज ढासळल्याची घटना घडली होती. त्या ठिकाणीही सह्याद्री प्रतिष्ठानच्या 400 शिवभक्तांनी एकत्र येत सर्व दगड रणटेकडीवर सुरक्षित ठेवले होते. त्यामुळे गडकिल्ल्यांची ढासळण्याची मालिका सुरु आहे, ती कुठेतरी थांबवावी असा सूर शिवभक्त आणि महाराष्ट्र जनतेतून व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.