मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूरमध्ये एसटी बस पलटली, 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर

सोलापूरमध्ये एसटी बस पलटली, 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर

सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे.

सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे.

सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे.

  • Published by:  sachin Salve
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 24 जुलै : सोलापूरमध्ये (solapur) राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला अपघात (st bus accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी झाली आहे. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी 4 जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास बसला अपघात झाला आहे. पुलावरून जात असताना अचानक एसटी बस चालकाने नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये 4 जण गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांना देखील पाचरण करण्यात आलं आहे. (नीरज चोप्राने रचला इतिहास, जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 'रुपेरी' कामगिरी) सोलापूर - गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.  चिखलातील ट्रॅक्टर काढताना हेड-ट्रालीमध्ये चेंगरून चालक ठार दरम्यान, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात चिखलामुळे एका ट्रॅक्टर चालकाचा बळी गेला. चिखलात रुतलेल्या ट्रॅक्टर काढताना, हेड आणि ट्रॉलीच्यामध्ये उभा असलेल्या चालकाचा अचानक हेड उचकल्याने चेंगरून मृत्यू झाला. हा अपघाताची घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर पाटोदा येथे घडली. गंगाधर बळीराम तोडकर वय 42 रा. पाटोदा म . असे मृत चालकाचे नाव आहे. (हर घर तिरंगा! स्वातंत्र्यदिनाच्या नियमात मोठा बदल,आता घरोघरी फडकावता येणार ध्वज) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गंगाधर तोडकर हे दुसऱ्याच्या शेतात टाकण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये माती भरून घेऊन जात होते. या दरम्यान दोन दिवसापासून परिसरात रिमझिम पाऊस असल्याने चिखल झाला आहे. एका ठिकाणी चिखलात ट्रॅक्टरचे चाक फसल्याने ते हेड आणि ट्रॉलीच्या मध्ये उभे राहिले. यावेळी अन्य एका चालकाने त्यांना तिथे उभे न राहण्याबाबत सूचित केले. मात्र खाली चिखलात पाय भरतील म्हणून गंगाधर तिथेच उभे राहिले. यावेळी अचानक हेड समोरच्या बाजूने उचलले गेल्याने हेड आणि ट्रॉलीच्या मध्ये चेंगरून गंगाधर यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने ममदापुर पाटोदा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
First published:

पुढील बातम्या