जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 80 महिला रुग्णांचे अश्लिल व्हिडीओ ठेवले लॅपटॉपमध्ये, देवमाणूस नावाच्या नराधमाचा 'असा' झाला पर्दाफाश

80 महिला रुग्णांचे अश्लिल व्हिडीओ ठेवले लॅपटॉपमध्ये, देवमाणूस नावाच्या नराधमाचा 'असा' झाला पर्दाफाश

महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश

महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश

कोल्हापुरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आपल्याकडे उपचारासाठी येणाऱ्या महिलांचे डॉक्टरने चक्क अश्लील व्हिडीओ तयार केले आहेत.

  • -MIN READ Local18 Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 26 फेब्रुवारी, ज्ञानेश्वर साळुंखे : कोल्हापुरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आपल्याकडे उपचारासाठी येणाऱ्या महिलांचे डॉक्टरने चक्क अश्लील व्हिडीओ तयार केले आहेत. विशेष म्हणजे हा डॉक्टर बोगस असल्याची देखील माहिती समोर आली आहे. कोल्हापुरातील मुरगूडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या व्हिडीयोंमधील जवळपास सत्तर ते ऐंशी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसली आहे. या डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी यासाठी जवळपास चारशे जणांना एक निनावी पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. यातूनच हा प्रकार समोर आला आहे. महिलांसोबत अश्लील चाळे घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा डॉक्टर आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलांसोबत अश्लील चाळे करायचा. त्यानंतर तो व्हिडीओ क्लिप बनवायचा. त्याने हे सर्व व्हिडीओ त्याच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवले होते. मात्र त्याचा लॅपटॉप त्याने दुरुस्तीसाठी पाठवला आणि या घटनेचा भांडाफोड झाला. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे लॅपटॉप दुरूस्तीसाठी टाकल्यानंतरच या लॅपटॉपमध्ये असलेल्या महिलांच्या सत्तर ते ऐंशी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. महिला डॉक्टरकडे कंबर दुखीच्या उपचारासाठी गेली असता या डॉक्टरने महिलेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता म्हणून तुमची कंबर दुखते असं म्हटल्याचं देखील रेकॉर्ड झालं आहे. ‘तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता’, डॉक्टराने रेकॉर्ड केल्या महिला रुग्णांच्या 80 क्लिप, कोल्हापुरात खळबळ

News18लोकमत
News18लोकमत

सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात हा बोगस डॉक्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयाची अॅड करत होता. त्यामुळे राज्यभरातूनच नाही तर परराज्यातून रुग्ण त्याच्याकडे उपचारासाठी येत होते. यामध्ये महिला रुग्णांचा देखील समावेश होता. याचाच गौरफायदा या डॉक्टरने घेतला. त्याने महिलांचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करून आपल्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात