जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापुरी लड्डू पान लय भारी! काय आहे खासीयत पाहा VIDEO

कोल्हापुरी लड्डू पान लय भारी! काय आहे खासीयत पाहा VIDEO

कोल्हापुरी लड्डू पान लय भारी! काय आहे खासीयत पाहा VIDEO

कोल्हापुरातील सरनाईक पान भवन यांनी मसाले पानाचा एक वेगळा प्रकार बाजारात आणला आहे. त्यांच्याकडे सध्या लड्डू पान हा मसाले पानाचा नवीन प्रकार बघायला मिळतो.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 26 ऑक्टोबर : आजकाल बाहेर जेवण झाल्यानंतर मसाले पान खाणं हे जणू सगळ्यांच्या अंगवळणीच पडले आहे. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. यामुळेच खवय्यांना आकर्षित करण्यासाठी साधारण मसाले पानाची चव, त्याचं दिसणं यामध्ये बदल करून वेगवेगळ्या फ्लेवर्सची मसाले पानं सध्या आपल्याला बघायला मिळतात. कोल्हापुरातील सरनाईक पान भवन यांनी देखील मसाले पानाचा एक वेगळा प्रकार बाजारात आणला आहे. त्यांच्याकडे सध्या लड्डू पान हा मसाले पानाचा नवीन प्रकार मिळतो. कोल्हापुरातील खासबाग मैदानाजवळ असणाऱ्या खाऊ गल्लीत राहुल सरनाईक यांचे पानाचे दुकान आहे. त्यांनी मसाले पानाचे सर्व जिन्नस योग्य प्रमाणात वापरून हे लड्डू पान तयार केले आहे. हे लड्डू पान खरंतर दिसायला एखाद्या चविष्ट अशा मिठाई सारखे दिसते. पण ते तोंडात टाकताच आपल्याला एखाद्या मसाले पानाची चव लागते. राहुल सरनाईक यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेला पानाचा व्यवसाय पुढे चालवला आहे. पण त्याच्यात वैविध्य आणून त्यांनी लड्डू पानाचा हा नवीन प्रकार बाजारात आणला आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक गुलकंद पिस्ता वेगवेगळ्या फ्लेवरचे पान देखील मिळतात. 20 ते 30 रुपये अशी या प्रत्येक पानाची किंमत आहे. हेही वाचा :  Kolhapur Ambabai Temple : दिवाळीच्या पहाटे काकडानं उजळलं अंबाबाई मंदिराचे शिखर, काय आहे महत्त्व? असं बनवतात लड्डू पान हे लड्डू पान बनवण्यासाठी नागवेलीचे पान, खिसलेले खोबरं आणि मिल्कमेड एकत्र करून एक मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण कढईमध्ये गरम करून घेण्यात येते. या मिश्रणात भरण्यासाठी जे सारण वापरण्यात येते. ते गुलकंद धना डाळ बडीशेप बारीक टूटीफ्रूटी, काजू, बदाम यांच्यापासून तयार केले जाते, असं राहुल सरनाईक यांच्या बहीण वैशाली काळुगडे सांगतात. खवय्यांकडून काहीतरी वेगळं खाण्याची नेहमीच मागणी असते. त्यामुळे आम्ही हे लड्डू पान तयार केले आहे. या पानासोबतच आमच्याकडे ड्रायफ्रूट पान, केसर मसाला पान आणि बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेवरचे  पानं मिळतात. हे लड्डू पान सगळ्यांनाच पसंतीस पडले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी स्त्रिया सुद्धा हे लड्डू पान आवडीने खातात. या पानाचा त्यांच्या आरोग्यावर काही वाईट परिणाम देखील होत नाही, असं सरनाईक पान भवनचे मालक राहुल सरनाईक यांनी सांगितले. हेही वाचा :  Mumbai : संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी ‘असा वडापाव’ मिळणार नाही, पाहा Video एखादी मिठाई खाल्ल्यासारखे वाटते  हे पान दिसायला पण वेगळे दिसते. तोंडात टाकता क्षणी हे लड्डू पान विरघळते. त्यामुळे एखादी मिठाई खाल्ल्यासारखे वाटते, असं खवय्ये सांगतात. किती रुपये आहे पानांची किंमत सरनाईक यांच्या दुकानात साधे पान 10/- रुपये, कोणतेही फ्लेवर्ड पान 20/- रुपये तर लड्डू पान 25 /- रुपयांना मिळते. त्याचबरोबर ड्रायफ्रूट पान हे 30/- रुपयांना आहे. तर ऑर्डर नुसार बनविले जाणारे गोल्डन वर्क असलेले मसाले पान हे 2500/- रुपयांना एक आहे.

    गुगल मॅपवरून साभार

    सरनाईक पान भवन पत्ता  सरनाईक पान भवन, खाऊ गल्ली, खासबाग मैदानाजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर - 416112

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , kolhapur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात