जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai : संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी 'असा वडापाव' मिळणार नाही, पाहा Video

Mumbai : संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी 'असा वडापाव' मिळणार नाही, पाहा Video

Mumbai : संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी 'असा वडापाव' मिळणार नाही, पाहा Video

Mumbai : अख्खी मुंबई पालथी घातली तरी तुम्हाला असा वडापाव मिळणार नाही. संपूर्ण मुंबईतील लोकं इथं वडापाव खायला येतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 25 ऑक्टोबर :  मुंबई च्या वेगवान आयुष्यातील लोकप्रिय फास्ट फुड म्हणजे वडापाव. लोकल पकडण्याची घाई असताना लागेली भूक, लंच ब्रेक या सारखे घाईचे प्रसंग असो किंवा मित्रांसोबत छोटी पार्टी करायची असेल तर वडापावची आठवण हमखास येते. मुंबईच्या कोणत्याही भागात तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला वडापावची गाडी हमखास दिसते. मुंबईकरांचे वडापावबद्दलचे हे प्रेम लक्षात घेऊन आता काही ब्रँड देखील या व्यवसायात उतरले आहेत. मुंबईचा हा वडापाव आता सातासमुद्रापारही प्रसिद्ध आहे. वडापावचे वेगवेगळे प्रकार आता मुंबईत मिळतात. कुठे  कुठे उलटा वडापाव,कुठे झटका वडापाव तर कुठे मायो -शेजवान वडापाव असे कित्येक प्रकारचे वडापाव खायला मिळतात. या सर्व वडापावमध्ये मुलुंडचा मसाला वडापाव विशेष प्रसिद्ध आहे.अख्खी मुंबई पालथी घातली तरी तुम्हाला असा वडापाव मिळणार नाही. या ठिकाणी मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून लोक मसाला वडापाव टेस्ट करण्यासाठी येत असतात. कसा तयार होतो मसाला वडापाव? सर्वप्रथम तव्यावर बटर टाकून त्याला गरम करतात त्यावर लसूण, लाल तिखट अद्रक, मिरची, विशिष्ट मसाले या पदार्थांपासून  बनवलेली लाल चटणी घालून कोथिंबीर मिक्स करतात. त्या अगदी तापलेल्या मसल्यामध्ये पाव मॅरीनेट करून गरमागरम वडापाव प्लेट मध्ये मिळतो. विद्यार्थ्यांना फक्त 5 रुपयांमध्ये मिळतो वडापाव! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे आणि किती वाजता मिळतो हा वडापाव? मुलुंड पश्चिम येथे कालिदास मांड्या मसाला वडापाव हे दुकान आहे. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी मसाला वडापाव मिळतो. दररोज 300 ते 400 वडापाव विक्री या ठिकाणी होते. मसाला वडापाव हे नाव वाचताच खूप तिखट झणझणीत असा वडापाव तुमच्या डोळ्यासमोर येईल मात्र हा वडापाव तिखट न खाणारे सुद्धा अगदी सहज खाऊ शकता व तिखट खाणाऱ्यांना सुद्धा यातला मसाला टेस्टमध्ये जाणवेल असा हा स्पेशल मसाला वडापाव आहे. ‘मुंबईत फक्त आमच्याकडेच हा वडापाव मिळतो. खूप लांबून लोक हा वडापाव खाण्यासाठी येतात. तसेच जास्त बटर मध्ये मसाला तळून घेतो म्हणून तो जास्त तिखट लागत नाही. असा स्पेशल आमचा वडापाव आहे,’ अशी माहिती हा वडापाव तयार करणाऱ्या  सुजित मंडल यांनी दिली आहे.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , mumbai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात