जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आघाडीत पुण्यानंतर कोल्हापुरात ठिणगी? दोन्ही जागेवर ठाकरेंचा दावा; राष्ट्रवादीची चिंता वाढली

आघाडीत पुण्यानंतर कोल्हापुरात ठिणगी? दोन्ही जागेवर ठाकरेंचा दावा; राष्ट्रवादीची चिंता वाढली

आघाडीत पुण्यानंतर कोल्हापुरात ठिणगी?

आघाडीत पुण्यानंतर कोल्हापुरात ठिणगी?

महाविकास आघाडीत आतापासून जागावाटपावरुन बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतेच पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला होता. आता ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये दोन जागेवर दावा केला आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत कोल्हापूर, 27 मे : महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु झालीय. त्यात ठाकरे गटानं कोल्हापूरच्या लोकसभेच्या दोन्ही जगावर दावा केलाय. खरंतर कोल्हापूरची जागा तशी राष्ट्रवादीची आहे. पण, आता शिवसेनेनं हातकंणगलेसह कोल्हापूर मतदारसंघावरही दावा केल्यानं, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचं ‘ठरलं’.. राष्ट्रवादीला घेरलं कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघावर आता ठाकरे गटानं दावा ठोकला आहे. 2019 ला हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि कोल्हापूरमधून संजय मंडलिक धनुष्यबणावर निवडून गेले होते. दोन्ही उमेदवार निवडून आल्यानं, कधी नव्हे ते शिवसेनेचे दोन खासदार कोल्हापूरला मिळाले होते. दोन खासदारांमुळे शिवसेनेची ताकदही वाढल्याचं दिसत होतं. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे दोन्ही खासदार शिंदेंच्या शिनसेनेत गेले. पण, असं असलं तरी कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर ठाकरे गटानं दावा केला आहे. वाचा - सावरकरांच्या मुद्यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना नागपुरी शब्दात सुनावलं, म्हणाले… खरंतर लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ शिल्लक आहे. पण, महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळं आतापासून प्रत्येक पक्ष मतदारसंघांची चाचपणी करु लागलाय. त्यामुळं जसजसे महिने उलटतील, तसतसा हा जागावाटपात मुद्दा कळीचा ठरू शकतो. आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागांचा मुद्दा सामंजस्यानं सुटतो की आघाडीत बिघाडी होते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्यात राष्ट्रवादीचा दावा पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दावा ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असण्याकडे अजित पवारांनी बोट दाखवलं. त्यानंतर काँग्रेसने पुणे लोकसभेत त्यांचे हात कसे मजबूत आहेत, याचं गणित मांडलं. पुणे लोकसभेतील सहा विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक आमदार आहेत. कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभेत काँग्रेसचा थोडक्यात पराभव झाला. या उलट पर्वतीमध्ये राष्ट्रवादीचा मोठ्या फरकाने पराभव झाला. मग कोणाची ताकद जास्त हे सर्वश्रुत आहे, असं म्हणत मविआचा वाटपात ही जागा आम्हालाच मिळणार, असा दावा काँग्रेसने केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात