जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसमोरील पहिलं आव्हान; ठिकाण कोल्हापूर अन् तारीख 13 जुलै!

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसमोरील पहिलं आव्हान; ठिकाण कोल्हापूर अन् तारीख 13 जुलै!

   बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले जाणार आहे. विशेष बॅरेगेटींग करुन सर्व एन्ट्री पाँईंट बंद केले जाणार आहे.

बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले जाणार आहे. विशेष बॅरेगेटींग करुन सर्व एन्ट्री पाँईंट बंद केले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यापैकी पहिलं आव्हान हे कोल्हापूरातील आंदोलन असू शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 9 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यापैकी पहिलं आव्हान हे कोल्हापूरातील आंदोलन असू शकतं. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी 13 जुलै रोजी आंदोलन पुकारलं आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान अद्यापही जमा झालेले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चापूर्वी राजू शेट्टी यांनी काँग्रेस काय, भाजप काय, शिवसेना काय, राष्ट्रवादी काय आणि शिंदे गट काय सगळे ओके आहे. पन्नास खोकी पण ओके आहेत. मात्र 13 जुलैला आंदोलनात सहभागी झाला नाही तर तुमचा कार्यक्रम ही ओके आहे, असं म्हणत शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं.

जाहिरात

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जात आहे. आज पत्रकार परिषदेतही याबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) 92 नगरपरिषदा (Nagar Parishad Election) आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा (Nagar Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation ) अनिवार्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सत्ता बदलानंतर शिंदे आणि फडणवीसांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेतल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे. आजही पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना याबाबत सवाल विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका घेणे योग्य होणार नाही. या शिवाय सध्या पाऊस आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं शिेदेंनी यावेळी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात