जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News: आठवण स्वातंत्र्य लढ्याची आणि सैनिकांची, शिवाजी विद्यापीठाचा कौतुकास्पद उपक्रम

Kolhapur News: आठवण स्वातंत्र्य लढ्याची आणि सैनिकांची, शिवाजी विद्यापीठाचा कौतुकास्पद उपक्रम

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठाची शिववाणी; 300 हून अधिक स्वातंत्र्य सैनिकांच्या माहितीचा खजिना

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठाची शिववाणी; 300 हून अधिक स्वातंत्र्य सैनिकांच्या माहितीचा खजिना

ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या माहितीचा खजिना शिवाजी विद्यापीठाने ‘शिववाणी’वर खुला केला.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 25 जून : आपल्या घरादाराचा काहीही विचार न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, इंग्रज सत्ते विरोधात लढताना मरण यातना सहन करणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या माहितीचा खजिना सर्वांसाठी खुला झाला आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाने ‘शिववाणी’च्या माध्यमातून हे काम केले आहे. आतापर्यंत 300 हून अधिक स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व्हीडिओच्या माध्यमातून प्रकाशित झाली असून ती ‘शिववाणी’ या विद्यापीठाच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनोखा संकल्प देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होताना वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले होते. याच काळात 15 ऑगस्ट 2022 रोजी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठानेही एक उपक्रम हाती घेतला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या संकल्पनेतून ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ ही एक ध्वनी मालिका सुरू करण्यात आली. ही मालिका शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शिववाणी या विद्यापीठाच्या वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहे. सध्या या मालिकेने 300 पेक्षा जास्त भाग प्रसारित करण्यात आले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

कशी सुचली कल्पना? शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे ऑगस्ट 2022 रोजी बेळगाव दौऱ्यावर असताना तिथे एका प्रदर्शनात देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणारे प्रदर्शन पाहिले होते. यातूनच त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमधून खेड्यापाड्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची माहिती एकत्रित करण्याचे ठरवले. त्यानुसार अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना ही ध्वनी मालिका सुरू करण्यात आली. देशातील असा एकमेव उपक्रम देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल अपेष्टा सोसणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांची काळाच्या ओघात हरवत चाललेली माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठ करत आहे. कुलगुरू डॉ शिर्के यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला हा अनोखा उपक्रम राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव उपक्रम असावा, असे मत विद्यापीठातीतल इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी व्यक्त केले आहे. शिव-शाहू विचारांचा संदेश देणारी अनोखी रिक्षा, कोल्हापूरकराचा VIDEO पाहून वाटेल अभिमान! कसा राबवला जातोय उपक्रम ? इतिहास विभागाचा एक प्रकल्प म्हणूनच हा उपक्रम पार पाडण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह सीमा भागातील बेळगाव, संकेश्वर, निपाणी आणि चिकोडी या भागातील ज्ञात अज्ञात अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. माहिती संकलनाची संपूर्ण जबाबदारी इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील आणि डॉ. दत्तात्रय मचाले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या दोघांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रासह इतर भागातील इतिहासाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्याकडे प्रकल्प म्हणून माहिती, छायाचित्र यांच्या संकलनाची जबाबदारी दिली आहे. मिळालेली माहिती ऑडिओ आणि टेक्स्ट फॉरमॅटमध्ये रूपांतरित करणे, माहितीची अधिकृतता तपासणे हे काम डॉ. अलोक जत्राटकर करत आहेत. तर ध्वनीफितीचे वाचन सुष्मिता खुटाळे यांनी केले आहे. यातून तयार होणारी ध्वनीफित शिववाणी (https://www.youtube.com/@ShivVani1) या शिवाजी विद्यापीठाच्या अधिकृत वाहिनीवरून प्रसारित करण्यात येते. रोज सकाळी 9 वाजता या ध्वनी मालिकेतील एक भाग प्रसारित केला जातो. या पाच ते दहा मिनिटांच्या भागात संबंधित स्वातंत्र्य सैनिकाची संपूर्ण माहिती काही दुर्मिळ छायाचित्रांसह देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो, असे डॉ. मचाले यांनी सांगितले. कोल्हापुरात काम करत घ्यायचंय शिक्षण? मग इथं घ्या ॲडमिशन, पाहा Video स्वातंत्र्य सैनिकांची माहिती येणार पुस्तक रुपात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातून या एका उप्रकामाच्या माध्यमातून 300 हून अधिक स्वातंत्र्य सैनिकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. तोपर्यंत संकलित होणाऱ्या या सर्व माहितीचे पुस्तकात रूपांतर करण्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांचा मानस आहे. हे पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे डॉ. अवनीश पाटील यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात