जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bjp Mumbai Ganesh Festival : गणपती विसर्जनावेळी मुंबईत भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, पोलीस येताच…

Bjp Mumbai Ganesh Festival : गणपती विसर्जनावेळी मुंबईत भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, पोलीस येताच…

Bjp Mumbai Ganesh Festival : गणपती विसर्जनावेळी मुंबईत भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, पोलीस येताच…

मागच्या दहा दिवसांपासून राज्यभरातील अनेक गणेश मंडळे मोठ्या थाटामाटात गणपती उत्सव साजरा करत आहेत. काल लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप दिला. (Bjp Mumbai Ganesh Festival)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 सप्टेंबर : मागच्या दहा दिवसांपासून राज्यभरातील अनेक गणेश मंडळे मोठ्या थाटामाटात गणपती उत्सव साजरा करत आहेत. काल लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप दिला. (Bjp Mumbai Ganesh Festival) दरम्यान मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात गणपती उत्सव साधेपणात झाले होते. यामुळे यंदा डीजे आणि पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले यामध्ये मुंबईत मात्र भाजपच्याच दोन गटात जोरदार वादावादी दिसून आली यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. दिंडोशीमध्ये हा प्रकार घडला अखेर पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याने वातावरण शांत झाले.

जाहिरात

मुंबईच्या इतर भागांप्रमाणेच दिंडोशीमध्ये जोरदार गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, यावेळी भाजप आमदार राजहंस सिंह आणि भाजप पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले. नेमक कोणत्या कारणावरून दोन गट आमने सामने आले याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसली, तरी या दोन्ही गटांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तुफान वादावादी झाली. हे दोन्ही गट आमने-सामने भिडल्यामुळे परिसरात काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते परंतु वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले.

हे ही वाचा :   Shiv Sena sanjay raut : संजय राऊत यांना जामीन मिळणार? सुनिल राऊत मातोश्रीवरून थेट दिल्लीत पोहोचले

गणेशोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्वागत मंचाजवळच हा सगळा राडा सुरू असल्यामुळे संभाव्य कोंडी आणि मोठा वाद टाळण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद काहीसा कमी झाला.

औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट

जाहिरात

एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांच्या बंडानंतर शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. मात्र, हे राजकीय नाट्य गणपती विसर्जनावेळीही पाहायला मिळालं.औरंगाबादमध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. औरंगाबाद शहरातील मुख्य गणेश महासंघ गणपतीच्या आरतीवरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं. यावेळी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी विसर्जन स्थळावरून काढता पाय घेतला.

जाहिरात

हे ही वाचा :  VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे येण्याच्या अगोदरच महासंघ अध्यक्ष विजय अवताडे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते आरती केल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळालं. यानंतर खैरे यांनी याठिकाणहून काढता पाय घेतला तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही कार्यक्रम स्थळावरून निघून गेले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात