कोल्हापूर, 09 डिसेंबर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 40 गावे आमच्यात विलीन होणार असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमाभागात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. यावरून जोरदार वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यायलाकडून कलम 144 लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात महाविकास आघाडीने 10 डिसेंबरला आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषीक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा होत आहेत.
हे ही वाचा : पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video
यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. 9 ते 23 डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात राहणार बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.
काय आहेत नियम?
शनिवारी 10 डिसेंबर 2022 रोजी कर्नाटक सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ कोल्हापूर येथे एकत्रित जमून निषेध व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद न मिटलेस कोल्हापूरसह महाराष्ट्र बंद देखील करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.
तसेच कोल्हापूर जिल्हयात 12 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हयात विविध पक्ष/संघटना, व्यक्ती / समुह यांच्याकडून विविध मागण्या संदर्भाने मोर्चा, रॅली, उपोषण, आत्मदहन, धरणे इ. प्रकारची संभाव्य आंदोलने, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनाकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने या बाबत कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा : Sangli : सीमावादात सर्वसामान्यांची पायपीट, रेणुकादेवी भक्तांचे मोठे हाल, Video
या कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951(The Maharashtra Police Act, 1951) चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी करण्यात येणार आहे. यामुळे 5 पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Gram panchayat, Kolhapur